अंबाजोगाई ( बीड) : सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेबीड जिल्ह्यात एक मोठी कारवाई केली आहे. अंबाजोगाई येथील सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी (वर्ग-३) संतोष भंडारी यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. जालना येथील एसीबी पथकाने सोमवारी दुपारी ५ वाजेच्या सुमारास हा सापळा रचला होता.
यातील तक्रारदार हे एका पतसंस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या विरोधात निबंधक कार्यालयात काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या चौकशीत मदत करण्यासाठी आणि अहवाल अनुकूल देण्यासाठी संतोष भंडारी यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. शेवटी २५ हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, लाच देण्याऐवजी तक्रारदाराने भ्रष्टाचाराचा हा बुरखा फाडण्याचे ठरवले आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
एसीबीचा 'सर्जिकल स्ट्राईक' तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जालना एसीबीचे उपअधीक्षक जाधवर आणि त्यांच्या पथकाने सोमवारी दुपारी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने २५ हजार रुपये भंडारी यांना देताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे बीड जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी भंडारी याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
Web Summary : In Ambejogai, a cooperation officer was caught red-handed by ACB while accepting a ₹25,000 bribe. He demanded money for favorable reports regarding complaints against a secretary of a credit society. The arrest caused a stir in Beed's cooperative sector.
Web Summary : अंबाजोगाई में, एक सहकार अधिकारी को एसीबी ने 25,000 रुपये की रिश्वत लेते हुए रंगे हाथों पकड़ा। उन्होंने एक क्रेडिट सोसाइटी के सचिव के खिलाफ शिकायतों के बारे में अनुकूल रिपोर्ट के लिए पैसे की मांग की थी। गिरफ्तारी से बीड के सहकारी क्षेत्र में हड़कंप मच गया।