Beed Crime: जातपंचायतीच्या दंडाच्या रकमेवरून वाद; २०० रुपयांसाठी गेला मजुराचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 18:33 IST2026-01-30T18:32:26+5:302026-01-30T18:33:18+5:30

या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Beed Crime: Dispute over the amount of the fine of the caste panchayat; Laborer's life was lost for Rs 200 | Beed Crime: जातपंचायतीच्या दंडाच्या रकमेवरून वाद; २०० रुपयांसाठी गेला मजुराचा जीव

Beed Crime: जातपंचायतीच्या दंडाच्या रकमेवरून वाद; २०० रुपयांसाठी गेला मजुराचा जीव

सिरसाळा: अवघ्या २०० रुपयांच्या क्षुल्लक वादातून झालेल्या धक्काबुक्कीत एका ४० वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सिरसाळा येथील मसनजोगी वस्तीत घडली आहे. संजू गंगाराम उबदे (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिरसाळा येथील मसनजोगी वस्तीत राहणारे सायलू रामलू पस्तमवाड आणि गंगा पस्तमवाड यांचा संजू उबदे यांच्याशी पैशांच्या कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, सायलू आणि गंगा यांनी संजू उबदे यांना पाठीवर जोरात धक्का दिला. या धक्क्यामुळे संजू यांचा तोल गेला आणि ते तोंडावर जमिनीवर आदळले. यात त्यांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. संजू उबदे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परळी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सायलू पस्तमवाड याच्यासह आणखी एकाला ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

जातपंचायतीतील दंड ठरला वादाचे मूळ
या हत्येच्या घटनेमागे 'जातपंचायती'ची पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. एका अनैतिक संबंधाच्या प्रकरणावरून सिरसाळ्यात जातपंचायत बसली होती. या पंचायतीत संबंधितांना ९० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. ही दंडाची रक्कम समाजबांधवांमध्ये वाटण्यात आली होती. मात्र, या वाटणीतील आणि एकमेकांना दिलेल्या उसने पैशांच्या हिशेबावरून (अंदाजे २०० रुपये) संजू उबदे यांचा पस्तमवाड यांच्याशी वाद झाला आणि त्यातच त्यांचा जीव गेला.

Web Title : बीड: जाति पंचायत के जुर्माने के विवाद में मजदूर की ₹200 के लिए मौत

Web Summary : सिरसाला में जाति पंचायत के जुर्माने को लेकर ₹200 के विवाद में 40 वर्षीय मजदूर संजू उबदे की मौत हो गई। बहस के दौरान धक्का लगने से उसकी जान चली गई। पुलिस ने दो संदिग्धों को गिरफ्तार किया है। विवाद पहले एक मामले में जाति पंचायत के फैसले के बाद बकाया पैसे को लेकर था, जिसमें ₹90,000 का जुर्माना लगाया गया था।

Web Title : Beed: Caste Panchayat fine dispute leads to laborer's death over ₹200.

Web Summary : In Sirsala, a ₹200 dispute over a caste panchayat fine led to the death of a 40-year-old laborer, Sanju Ubade. He died after being pushed during an argument. Police have arrested two suspects. The dispute stemmed from money owed after a prior caste panchayat ruling regarding an affair and a fine of ₹90,000.