बीड एसीबीचा लाचखोरांना 'डबल' झटका; तलाठी अन् ग्रामसेवक जाळ्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 16:50 IST2026-04-08T16:48:59+5:302026-04-08T16:50:02+5:30

केजमध्ये वारस नोंदीसाठी ९ हजार, तर परळीत विहीर बिलासाठी ५०० रुपये घेताना रंगेहाथ पकडले

Beed Crime: Beed ACB's 'double blow' to bribe takers; Talathi and Gram Sevak arrested while taking bribe | बीड एसीबीचा लाचखोरांना 'डबल' झटका; तलाठी अन् ग्रामसेवक जाळ्यात!

बीड एसीबीचा लाचखोरांना 'डबल' झटका; तलाठी अन् ग्रामसेवक जाळ्यात!

बीड: जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी एकाच दिवशी दोन धडाकेबाज कारवाया करून भ्रष्ट महसूल आणि ग्रामविकास प्रशासनाला मोठा धक्का दिला आहे. केज तालुक्यात एका तलाठ्याला ९ हजार रुपये, तर परळी तालुक्यात एका ग्रामसेवकाला ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली.

पहिली कारवाई: केज तालुक्यात माजी सैनिक असलेला तलाठी जाळ्यात
केज तालुक्यातील दहिफळ (वडमाऊली) येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) परमेश्वर अभिमान जाधव (वय ४७) याला ९ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. तक्रारदाराच्या वारसाप्रमाणे सातबाऱ्यावर नोंदी करण्यासाठी जाधव याने ३५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ९ हजार रुपये कामाच्या अगोदर आणि उर्वरित पैसे काम झाल्यावर देण्याचे ठरले होते. विशेष म्हणजे, परमेश्वर जाधव हा माजी सैनिक असून निवृत्तीनंतर सहा महिन्यांपूर्वीच तलाठी म्हणून सेवेत रुजू झाला होता. नवीन नोकरीत अवघ्या सहा महिन्यातच तो एसीबीच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या पथकाने गावात जाऊन केली.

दुसरी कारवाई: परळीत विहीर बिलाच्या सहीसाठी ग्रामसेवक जेरबंद
परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) दशरथ देविदासराव गोरे याला ५०० रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. जलसिंचन विहिरीच्या कुशल बांधकामाचे बिल काढण्यासाठी त्याने एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेची मागणी पंचायत समिती कार्यालय परिसरात करण्यात आली होती, मात्र त्यानंतर आपल्या खासगी कार्यालयात ५०० रुपये स्वीकारताना पोलीस निरीक्षक कवडे आणि त्यांच्या पथकाने गोरेला रंगेहाथ पकडले.

Web Title : बीड एसीबी का रिश्वतखोरों पर दोहरा वार: तलाठी और ग्राम सेवक गिरफ्तार

Web Summary : बीड एसीबी ने केज में 9,000 रुपये की रिश्वत मांगने पर एक तलाठी और परली में 500 रुपये स्वीकार करते हुए एक ग्राम सेवक को गिरफ्तार किया, जिससे स्थानीय प्रशासन में भ्रष्टाचार उजागर हुआ।

Web Title : Beed ACB Nets Two Bribe-Takers: Village Officer, Land Record Official Arrested

Web Summary : Beed ACB arrested a land record official for demanding ₹9,000 bribe in Kej, and a village officer caught accepting ₹500 in Parli, exposing corruption within local administration.