शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्सने कट मारला अन् सळईने भरलेला कंटेनर घरावर उलटला; चालकाचा अंत, कुटुंब बचावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 12:29 IST

झोपेत असताना घरावरून गेला कंटेनर, आष्टी तालुक्यातील भीषण अपघातात तरुण चालकाचा बळी

कडा (जि. बीड): बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावरील कारखेल खुर्द (ता. आष्टी) येथे सोमवारी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. पुण्यावरून लोखंडी सळई घेऊन लातूरकडे जाणाऱ्या कंटेनरला एका ट्रॅव्हल्सने 'कट' मारल्याने चालकाचा ताबा सुटला आणि कंटेनर उलटला. या दुर्दैवी घटनेत चालक ज्ञानदेव गर्जे (वय २४) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी प्रवीण सोनवणे हा किरकोळ जखमी झाला आहे.

रस्त्यालगतची चार कुटुंबांचे नशीब बलवत्तरहा अपघात इतका भीषण होता की, ताबा सुटलेला कंटेनर रस्त्यालगत असलेल्या घरांच्या दिशेने गेला. घरासमोरील ओटे, पत्रे आणि झाडांना धडक देत कंटेनर थांबला. ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत होते. कंटेनर घराच्या आत शिरला असता तर मोठा अनर्थ घडला असता, मात्र सुदैवाने चार कुटुंबांचे नशीब बलवत्तर असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अंभोरा पोलिसांकडून पंचनामाघटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलीस ठाण्याचे हवालदार हरिभाऊ बांगर, शिवदास केदार, अमोल शिरसाठ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृत ज्ञानदेव गर्जे हा मूळचा आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील रहिवासी असून तो मालवाहतूक वाहनावर चालक म्हणून काम करत होता. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून महामार्गावरील वाढत्या वेगामुळे अशा घटना घडत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Traveler's Cut Causes Container Truck to Crash into House; Driver Dies

Web Summary : A container truck driver died near Karkhel Khurd after a traveler's bus cut him off, causing the truck to crash into a house. The family inside survived. The driver, Dnyandev Garje, died on the spot. Police are investigating the incident, blaming excessive speed.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीडAccidentअपघात