दुचाकीच्या हुलकावणीमुळे कार ४ वेळा उलटली; भीषण अपघातात पतीसह गर्भवती पत्नी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 13:30 IST2026-04-11T13:27:25+5:302026-04-11T13:30:02+5:30

आष्टी-डोईठाण रोडवर भीषण अपघात; सासरवाडीला जात असताना बावी येथे दुचाकीस्वाराची हुलकावणी ठरली घातक

Beed Crime: Accident Near Ashti: Car Flips Four Times After Being Cut Off by Bike; Pregnant Woman Injured | दुचाकीच्या हुलकावणीमुळे कार ४ वेळा उलटली; भीषण अपघातात पतीसह गर्भवती पत्नी जखमी

दुचाकीच्या हुलकावणीमुळे कार ४ वेळा उलटली; भीषण अपघातात पतीसह गर्भवती पत्नी जखमी

कडा (बीड): आष्टी तालुक्यातील बावी फाट्यावर शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास कार आणि दुचाकीच्या हुलकावणीमुळे भीषण अपघात झाला. पाटोदा तालुक्यातील मारुतीची पांगरी येथे सासरवाडीच्या यात्रेसाठी कारने (MH 12 FF 3795) निघालेले हाजीपूर येथील संतोष गोल्हार आणि त्यांची पत्नी या अपघातात जखमी झाले आहेत. दुचाकीस्वाराने अचानक हुलकावणी दिल्याने गोल्हार यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने चार पलट्या घेतल्या.

गर्भवती पत्नीची प्रकृती चिंताजनक
अपघाताची भीषणता इतकी होती की कार रस्त्याच्या कडेला जाऊन चार वेळा उलटली. या अपघातात संतोष गोल्हार यांच्या पत्नी, ज्या गरोदर आहेत, त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर त्यांना तीव्र वेदना होत असल्याने तातडीने आष्टी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

ग्रामस्थांची मदतीसाठी धाव
अपघात होताच परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने जखमींना बावी येथील खाजगी दवाखान्यात प्रथमोपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना आष्टीला हलवण्यात आले आहे. सुदैवाने या भीषण अपघातात जीवितहानी टळली असली तरी कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Web Title : बाइक से बचने में कार चार बार पलटी; गर्भवती महिला घायल।

Web Summary : बावी फाटा के पास, एक बाइक के कारण कार चार बार पलटने से दुर्घटना हुई। एक गर्भवती महिला और उसके पति त्योहार के लिए यात्रा करते समय घायल हो गए। महिला की हालत गंभीर है।

Web Title : Car flips four times avoiding bike; pregnant woman hurt.

Web Summary : Near Bavi Phata, a car accident occurred when a bike caused the car to flip four times. A pregnant woman and her husband were injured while traveling to a festival. The woman's condition is serious.