Beed Crime: तमाशाच्या कार्यक्रमात पैसे उधळायला गेलेल्या युवकावर स्टेजवरच हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 18:50 IST2025-12-25T18:49:42+5:302025-12-25T18:50:21+5:30
सोनीजवळा येथील यात्रेतील घटना; याप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा

Beed Crime: तमाशाच्या कार्यक्रमात पैसे उधळायला गेलेल्या युवकावर स्टेजवरच हल्ला
केज : तालुक्यातील सोनीजवळा येथील म्हसोबा यात्रेनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात कलाकारांना पैसे देण्यासाठी गेलेल्या युवकावर जुन्या वादातून जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी युसूफवडगाव पोलिस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनीजवळा येथे सोमवारी (दि. २१) रात्री ९ वाजेच्या सुमारास यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी सुधीर प्रकाश वैरागे हे कलाकारांना पैसे देण्यासाठी स्टेजवर गेले होते. याच कारणावरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून सुधीर यांना घेरले. आरोपींनी सुधीर यांच्या पाठीवर काठीने, तर डोक्यात आणि खांद्यावर लोखंडी पाइपने प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या साक्षीदारालाही आरोपींनी बेदम मारहाण केली.
याप्रकरणी सुधीर वैरागे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक निवृत्ती वैरागे, राजू निवृत्ती वैरागे, वसंत निवृत्ती वैरागे, कृष्णा शंकर वैरागे, प्रभू मस्सा वैरागे, विशाल प्रभू वैरागे, प्रताप अशोक वैरागे, आकाश अशोक वैरागे, सचिन साहेबराव वैरागे, गणेश साहेबराव वैरागे, शंकर मस्सा वैरागे आणि शौर्या उत्तरेश्वर लोंढे (सर्व रा. सोनीजवळा) यांच्याविरुद्ध बुधवारी सायंकाळी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जमादार गिते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.