Beed: सोशल मीडियातील 'स्टोरी'वरुन आष्टीत दोन गट भिडले; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 17:51 IST2026-02-17T09:14:13+5:302026-02-17T17:51:36+5:30

सोशल मीडिया स्टेटसवरून आष्टीत रक्ताचा सडा; धारदार शस्त्राने तिघांवर हल्ला, एकाचा मृत्यू

Beed Crime: A 'story' on social media took lives! A fight broke out between two groups of youths in Beed's Ruinalkol Village; one died, two were left in a pool of blood. | Beed: सोशल मीडियातील 'स्टोरी'वरुन आष्टीत दोन गट भिडले; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर

Beed: सोशल मीडियातील 'स्टोरी'वरुन आष्टीत दोन गट भिडले; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर

dir="ltr">- नितीन कांबळे

कडा (बीड): सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात स्टेटस आणि स्टोरी टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथे सोमवारी रात्री तरुणांच्या दोन गटात धारदार शस्त्राने एकमेकांवर वार करण्यात आले. या हल्ल्यात एका २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.

नेमकी घटना काय?

आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील जिल्हा परिषद शाळेसमोर सोमवारी रात्री तरुणांचे दोन गट आमनेसामने आले. इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवर एकमेकांच्या विरोधात टाकलेल्या 'स्टोरी'वरून त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कुरापत काढली जात होती. याच वादाचे पर्यावसान सोमवारी रात्री हाणामारीत झाले. एका गटातील तरुणांनी रागाच्या भरात धारदार शस्त्राने दुसऱ्या गटातील तिघांवर सपासप वार केले.

एकाचा मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक

या भीषण हल्ल्यात दीपक शिवाजी नालकोल (वय २०, रा. रुईनालकोल) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तर, त्याच्यासोबत असलेले अन्य दोन तरुणही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर (अहमदनगर) येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोघांचीही प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

पोलीस प्रशासनाची धाव

घटनेची माहिती मिळताच आष्टीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, विक्रांत हिंगे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा नरवाडे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गावात सध्या तणावाचे वातावरण असून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. याप्रकरणी पुढील तपास आष्टी पोलीस करत असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Web Title : सोशल मीडिया विवाद घातक: बीड में एक की मौत, दो घायल

Web Summary : बीड, महाराष्ट्र में सोशल मीडिया पर विवाद के बाद हिंसक झड़प हुई। इंस्टाग्राम और व्हाट्सएप 'स्टोरी' को लेकर धारदार हथियारों से हमले में 20 वर्षीय युवक की मौत हो गई, दो अन्य गंभीर रूप से घायल हो गए। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Social Media Feud Turns Deadly: One Dead, Two Injured in Beed

Web Summary : A social media dispute escalated into a violent clash in Beed, Maharashtra. A 20-year-old died, and two others were critically injured after being attacked with sharp weapons over Instagram and WhatsApp 'stories'. Police are investigating.