बीडच्या बसस्थानक परिसरात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; दोन संशयित ताब्यात

By सोमनाथ खताळ | Updated: March 6, 2026 11:34 IST2026-03-06T11:34:09+5:302026-03-06T11:34:33+5:30

बीड बसस्थानक परिसरात तरुणाचा मृतदेह! मृत्यू की खून?

Beed Crime: 25-Year-Old Youth Found Dead Near Bus Stand; Two Suspects Detained, Police Investigation Underway | बीडच्या बसस्थानक परिसरात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; दोन संशयित ताब्यात

बीडच्या बसस्थानक परिसरात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; दोन संशयित ताब्यात

बीड: बीड शहरातील बसस्थानक परिसरात शुक्रवारी सकाळी एका २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत ही धक्कादायक घटना घडली असून, मयत तरुणाची ओळख गांधी नगर भागातील नौशाद (वय २५) अशी पटली आहे.

पोलिसांची घटनास्थळी धाव
सकाळच्या वेळी काही नागरिकांना बसस्थानकाच्या मागील मोकळ्या जागेत नौशाद पडलेला दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने मृतदेहाचा पंचनामा केला असून, परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

दोन संशयित ताब्यात, चौकशी सुरू
नौशादचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत परिसरात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. नागरिकांकडून खुनाची शक्यता वर्तवली जात असतानाच, पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर या घटनेचा सखोल तपास करत असून, लवकरच सत्य समोर येईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title : बीड: बस स्टैंड के पास युवक का शव मिला; दो हिरासत में।

Web Summary : बीड बस स्टैंड के पास 25 वर्षीय नौशाद का शव मिलने से सनसनी फैल गई। पुलिस जांच कर रही है, दो संदिग्धों को हिरासत में लिया गया है। पोस्टमार्टम रिपोर्ट आने तक मौत का कारण स्पष्ट नहीं है।

Web Title : Beed: Youth's body found near bus stand; two detained.

Web Summary : A 25-year-old man, Naushad, was found dead near Beed bus stand, causing a stir. Police are investigating, detaining two suspects. The cause of death is unclear pending autopsy results.