पोलिस दलात खळबळ! पुण्याहून तपास करून बीडला परताच अंमलदाराने आयुष्य संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 19:16 IST2026-04-08T19:10:27+5:302026-04-08T19:16:58+5:30

६ एप्रिलला पुण्यात तपास, ७ ला घरी परत अन् मध्यरात्री गळफास; माजलगावच्या पोलीस अंमलदाराच्या मृत्यूचे गूढ वाढले.

Beed Cop Commits Suicide After Returning from Investigation; Mystery Behind Locked Door | पोलिस दलात खळबळ! पुण्याहून तपास करून बीडला परताच अंमलदाराने आयुष्य संपवले

पोलिस दलात खळबळ! पुण्याहून तपास करून बीडला परताच अंमलदाराने आयुष्य संपवले

बीड: माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले ३५ वर्षीय पोलीस अंमलदार बाळकृष्ण जायभाये यांनी बुधवारी मध्यरात्री बीड शहरातील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. एका बेपत्ता मुलीच्या तपासासाठी ते ६ एप्रिल रोजी पुण्याला गेले होते. ७ एप्रिल रोजी रात्री उशिरा घरी परतल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेत त्यांनी घराच्या खालच्या दरवाजाला बाहेरून कडी लावून घेतली होती, ज्यामुळे सुरुवातीला या मृत्यूबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.

घटनास्थळावरील विदारक चित्र आणि संशय
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास जायभाये यांनी घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांच्या लोखंडी गजाला दोरीने गळफास लावला. घटनास्थळी दरवाजाजवळ एक बॅट आणि जिन्याजवळ दोन पायऱ्या आढळून आल्या आहेत. गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा एक पाय जमिनीला टेकलेला तर दुसरा वाकडा होता. घराला बाहेरून कडी लावलेली असल्याने या घटनेमागे नेमके काय कारण आहे, याबाबत परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली आहे.

पोलीस दलात हळहळ आणि तपास
बाळकृष्ण जायभाये यांनी अशा पद्धतीने स्वतःला संपवल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी हे टोकाचे पाऊल कामाच्या तणावातून उचलले की अन्य काही वैयक्तिक कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत. "काहीही अडचण असेल तर ती सहकाऱ्यांशी किंवा वरिष्ठांशी बोलून सोडवावी," असे आवाहन पोलीस बॉइज संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी केले आहे. सध्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, शवविच्छेदनानंतर अधिक माहिती समोर येईल.

Web Title : बीड में पुलिस अधिकारी की आत्महत्या से सनसनी: पुणे जांच यात्रा के बाद हादसा।

Web Summary : महाराष्ट्र के बीड में 35 वर्षीय पुलिस अधिकारी ने पुणे में लापता व्यक्ति की जांच से लौटने के बाद अपने घर पर आत्महत्या कर ली। दरवाज़ा बंद होने और असामान्य दृश्य सहित परिस्थितियाँ जांच के अधीन हैं। सहकर्मी स्तब्ध हैं, और पुलिस कारण की जांच कर रही है।

Web Title : Police Officer Suicide Shocks Beed: Pune Investigation Trip Preceded Tragedy.

Web Summary : A 35-year-old police officer in Beed, Maharashtra, tragically committed suicide at his home after returning from a missing person investigation in Pune. The circumstances, including a locked door and unusual scene, are under investigation. Colleagues are shocked, and the police are investigating the cause.