Beed: पाटोद्याजवळ मध्यरात्री कारची ट्रॅव्हल्सला धडक, पुण्याच्या दोघांचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 19:26 IST2025-05-09T19:26:19+5:302025-05-09T19:26:45+5:30

कार्यक्रमासाठी केजला निघालेल्या पुण्याच्या दोघांचा अपघातात मृत्यू

Beed: Car hits travel trailer near Patoya at midnight, two from Pune die on the spot | Beed: पाटोद्याजवळ मध्यरात्री कारची ट्रॅव्हल्सला धडक, पुण्याच्या दोघांचा जागीच मृत्यू 

Beed: पाटोद्याजवळ मध्यरात्री कारची ट्रॅव्हल्सला धडक, पुण्याच्या दोघांचा जागीच मृत्यू 

पाटोदा : अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर बांमदळ कोठा पुलानजीक भरधाव कारने उभ्या ट्रॅव्हल्सला धडक दिली. या भीषण अपघातात एका मुलासह दोघे जागीच ठार झाले. हा अपघात गुरुवारी मध्यरात्री रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला. ही कार कार्यक्रमासाठी केज येथील पाहुण्याकडे जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पुणेकडून केजकडे भरधाव निघालेल्या कारने नांदेड येथील खासगी कंपनीच्या ट्रॅव्हल्सला धडक दिली. यात अल्ताफ शेख (वय ४०) व अलमन शेख (वय १५, दोघेही रा. पुणे) अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलिस, पाटोदा पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर सुरू करण्यात आली.

Web Title: Beed: Car hits travel trailer near Patoya at midnight, two from Pune die on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.