Beed: भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; अंबाजोगाईतील रिंग रोडवर झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 12:18 IST2025-11-01T12:17:10+5:302025-11-01T12:18:23+5:30
मृत रांजणी येथील साखर कारखान्यात चीफ केमिस्ट म्हणून कार्यरत होते

Beed: भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; अंबाजोगाईतील रिंग रोडवर झाला अपघात
अंबाजोगाई : शहरातील रिंगरोडवरील मानवलोक कार्यालयाजवळ गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
चंद्रकांत मुरलीधर गंगणे (वय ५२, रा. राडी, ता. अंबाजोगाई) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते अंबाजोगाई येथील त्यांच्या घराकडे जात असताना हा अपघात झाला. मानवलोक कार्यालयाजवळ कारने दिलेल्या जोरदार धडकेत ते गंभीर जखमी झाले होते. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्यांना स्वाराती रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
चंद्रकांत गंगणे हे रांजणी येथील साखर कारखान्यात चीफ केमिस्ट म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अकाली मृत्यूची खबर येताच राडी गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या अपघाताची नोंद अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.