गटविकास अधिकाऱ्यांच्या सहा पथकांकडून विविध गणांत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:37 IST2021-05-25T04:37:13+5:302021-05-25T04:37:13+5:30

धारूर : जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशानुसार व गटविकास अधिकारी राजेश्वर कांबळे धारूर यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील सर्वच गावांत लॉकडाऊनला चांगला ...

Awareness on various counts by six teams of group development officers | गटविकास अधिकाऱ्यांच्या सहा पथकांकडून विविध गणांत जनजागृती

गटविकास अधिकाऱ्यांच्या सहा पथकांकडून विविध गणांत जनजागृती

धारूर : जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशानुसार व गटविकास अधिकारी राजेश्वर कांबळे धारूर यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील सर्वच गावांत लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी या सर्व गणांत पथक नेमून जनजागृती केली जात आहे, तसेच दोषींवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

मोहखेड गणात प्रमुख कृषी विस्तार अधिकारी बी.एन. आगळे, ग्रामसेवक एम.आर. दिवटे, सरपंच, अंगणवाडी ताई, आशाताई आदींनी तालुक्यात फिरून जनजागृती केली आहे. १५ मे २३ पर्यंत गटविकास अधिकाऱ्यांनी प्रति दिन ७ ग्रामपंचायतींप्रमाणे पूर्ण तालुका पिंजून काढला आहे. यामध्ये ग्रामसेवक, आशाताई, अंगणवाडीताई, ग्रा.पं. कर्मचारी यांचा मोलाचा सहभाग आहे. गटविकास अधिकारी राजेश्वर कांबळे यांनी फकीर जवळा, चिखली, देवठाणा, मुंगी, कांन्नापू मोहखेड, कोयाळ व सर्व तालुक्यांत सहा पथके नेमून जनजागृती केली आहे. त्याचप्रमाणे गावंदरा, तेलगाव, चिखली, हिंगणी, रुईधारूर, अंजनडोह येथे रविवारी दंडात्मक कारवाई करून १० हजार रुपये दंडवसुली केली आहे. ही कारवाई किराणा दुकान, मटण दुकान, हॉटेल्स अशांवर केली. आसरडोह या सहाही गणांत वेगवेगळी ६ पथके जनजागृती करीत आहेत व शासनाचे नियम तोडणाऱ्या दुकानांवर कारवाई करीत आहेत, अशी माहिती कृषी विस्तार अधिकारी बी. एन. आगळे यांनी दिली.

===Photopath===

240521\anil mhajan_img-20210523-wa0047_14.jpg~240521\img-20210523-wa0128_14.jpg

Web Title: Awareness on various counts by six teams of group development officers