न्यायालयात गैरहजर राहणाऱ्या आरोपींची धरपकड; एकाच दिवशी ११ जणांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 15:54 IST2024-03-26T15:53:54+5:302024-03-26T15:54:32+5:30

निवडणूकीच्या अनुषंगाने अंभोरा पोलिस ॲक्शन मोडवर 

Arrest of accused absent in court; 11 persons were detained on the same day | न्यायालयात गैरहजर राहणाऱ्या आरोपींची धरपकड; एकाच दिवशी ११ जणांना घेतले ताब्यात

न्यायालयात गैरहजर राहणाऱ्या आरोपींची धरपकड; एकाच दिवशी ११ जणांना घेतले ताब्यात

- नितीन कांबळे
कडा-
ठाणे हद्दीतील वेगवेगळ्या गुन्ह्यात असलेले आरोपी न्यायालयाने ठरवून दिलेल्या तारखेला हजर राहत नसल्याचे समोर आले होते. यामुळे न्यायालयाने अटक वाॅरन्ट काढताच अंभोरा पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आज एकाच दिवशी ११ आरोपीची धरपकड केली. या कारवाईतून पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे.

अंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील वेगवेगळ्या गुन्ह्यातील आरोपी सातत्याने न्यायालयात गैरहजर राहत होते. विविध गावातील अशा अकरा आरोपींना न्यायालयाने वॉरंट बजावले बजावले. त्यानंतर आज ॲक्शन मोडवर येत अंभोरा पोलिसांनी अकरा जणांची धरपकड केली. त्यांना न्यायालयात हजर करण्याची प्रकिया अंभोरा पोलिस करत आहेत. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,आष्टीचे उपअधीक्षक  अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंभोरा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके पोलिस उपनिरीक्षक सातव,पोलीस हवालदार मनोज खंडागळे, बाबुराव तांदळे, भरत माने, पोलीस नाईक प्रशांत कांबळे, अमोल ढवळे, पोलीस अंमलदार शिवदास केदार, अमोल शिरसाठ, सतीश पैठणे, सुदाम पोकळे, बाळू जगदाळे यांनी केली. 

Web Title: Arrest of accused absent in court; 11 persons were detained on the same day