पीेक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST2021-06-01T04:25:19+5:302021-06-01T04:25:19+5:30

... गटारींचे पाणी रस्त्यावर बीड : शहरात पहिल्याच पावसात गटारींचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे चित्र पहायला मिळाले. गटारींमध्ये मोठ्या ...

Apply online for a payday loan | पीेक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करा

पीेक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करा

...

गटारींचे पाणी रस्त्यावर

बीड : शहरात पहिल्याच पावसात गटारींचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे चित्र पहायला मिळाले. गटारींमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व कचरा साचला आहे. हा कचरा पालिकेने तातडीने उचलावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

...

शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज द्या

पाटोदा : खरीप पीक हंगामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक अडचण येऊ नये म्हणून बँकांनी तातडीने पीक कर्जाचे वाटप करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य विष्णुपंत घोलप यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना पाठिवले आहे, असेही घोलप यांनी सांगितले.

...

बियाणांबाबत काळजी घ्या

बीड : शेतकऱ्यांनी खरिपासाठी बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी. बियाणे खरेदी, बियाणे पिशव्यांची पॅकिंग व दुकानदारांकडून पावती घ्यावी. खरेदी केलेले बियाणे कोरड्या जागेत ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

.....

जनावरांचे बाजार सुरू करण्याची मागणी

बीड : जिल्ह्यातील जनावरांचे बाजार अनेक दिवसापासून बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बैल, गाय, म्हैस, शेळ्या खरेदी-विक्रीसाठी अडचणी येत आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असून जनावरांचे बाजार सुरू करावेत, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

....

...

Web Title: Apply online for a payday loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.