अरूंद रस्त्याचा आणखी एक बळी; झाडावर कार आदळून अपघात, एकजण जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 20:15 IST2022-06-21T20:14:48+5:302022-06-21T20:15:11+5:30
मागील काही दिवसांपासून धारूर घाटामधून जाणारा १२ किमीचा राष्ट्रीय महामार्ग अरूंद असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

अरूंद रस्त्याचा आणखी एक बळी; झाडावर कार आदळून अपघात, एकजण जागीच ठार
किल्लेधारूर (बीड ) : अरणवाडीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार (एम एच 20 बी एन 4200 ) झाडावर आदळून एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली. अपघातात चालक आसाराम नागरगोजे ( ३८, देवगाव) जागीच ठार झाला. तर बाळू मुरकुटे (३२) हे गंभीर जखमी झाले आहेत.
मागील काही दिवसांपासून धारूर घाटामधून जाणारा १२ किमीचा राष्ट्रीय महामार्ग अरूंद असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. आजही धारूरकडून तेलगावकडे जात असलेल्या एका कारचा आरणवाडी जवळ अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याशेजारील झाडावर आदळली. यात चालक आसाराम नागरगोजे जागीच ठार झाले. तर गाडीतील बाळू मुरकुटे जखमी झाले आहेत. जखमीला अधिक उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.
दरम्यान, याच अरुंद मार्गावर काही दिवसांपूर्वीच येथील पत्रकार दिगंबरा शिराळे यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास अद्यात पूर्ण झालेले नाही. यातच या अरुंद रस्त्यावर पुन्हा अपघात होऊन आणखी एकास जीव गमवावा लागला. या अरुंद रस्त्यावर आणखीन किती बळी जाणार असा सवाल नागरिक करत आहेत.