राज्यात कृषिसंलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना डॉ. पंजाबराव देशमुख, कृषिरत्न वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण सेंद्रिय शेती, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यान पंडित, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषिसेवा रत्न पुरस्कार, राज्यस्तरीय पीक स्पर्धा इत्यादी कृषी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते. त्या अनुषंगाने २०१८-१९साठी विविध कृषी पुरस्कारांची घोषणा ३१ मार्च रोजी करण्यात आली.
माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी अण्णासाहेब अर्जुनराव जगताप यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार शासनाच्या वतीने एका कार्यक्रमात देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या मिळालेल्या पुरस्काराबद्दल अण्णासाहेब जगताप यांचे स्वागत होत आहे.
===Photopath===
010421\purusttam karva_img-20210331-wa0044_14.jpg