अंगणवाडी सेविकांचा उपक्रम, पाखरांना मायेची पाखरण - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:32 IST2021-03-19T04:32:17+5:302021-03-19T04:32:17+5:30
पगार अत्यल्प असूनदेखील त्या कोरोनाच्या काळात आरोग्य विभागाला सहकार्य करत होत्या. आता तर कडक उन्हाळा सुरू झाला आहे. पशु-पक्ष्यांनादेखील ...

अंगणवाडी सेविकांचा उपक्रम, पाखरांना मायेची पाखरण - A
पगार अत्यल्प असूनदेखील त्या कोरोनाच्या काळात आरोग्य विभागाला सहकार्य करत होत्या. आता तर कडक उन्हाळा सुरू झाला आहे. पशु-पक्ष्यांनादेखील तहान-भूक असते, याची जाणीव या अंगणवाडीसेविकांनी ठेवली व त्यांनी जागोजागी रानातील झाडाला, घराच्या अंगणातील झाडाला दाणा-पाण्याची सोय केल्याने पाखरांना त्याचा चांगला उपभोग घेता येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी पशु-पक्ष्यांसाठी एक पाणवठा तयार करावा, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत तालुक्यातील या ताई पूर्तता करत आहेत.
अंगणवाडीच्या या उपक्रमाला बालविकास प्रकल्प अधिकारी महादेव जायभाय, विस्तार अधिकारी सखाराम बांगर, पर्यवेक्षिका सुवर्णा कुलकर्णी, मनोजा उरणकर, आशा करपे, सुनीता तावरे, पाटील, राऊत, सुनीता निंबाळकर, विकास कदम, पोपट काशीद हे सर्वजण सहकार्य करत आहेत .
विजया सस्ते (हिंगेवाडी), अयोध्या देवकर (हिवरसिंगा), पौंडूळ तांबे वस्ती, उंबरमुळी, आशा पाडळे (भोकरेवस्ती, आर्वी), हीरा मिसाळ (खोकरमोहा) यांच्यासह अंगणवाडी सेविकांनी पक्ष्यांसाठी ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अंगणवाडी सेविकांनी सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे प्रत्यक्ष उपस्थित राहून तांबे वस्ती येथे पंचायत समितीच्या सभापती उषाताई सरोदे यांनी चारा भरवत अयोध्या बेद्रे यांचे कौतुक केले. या उपक्रमाचे सर्वांनी जमेल तसे अनुकरण करावे, असे आवाहनदेखील केले.
===Photopath===
180321\18bed_1_18032021_14.jpg
===Caption===
शिरूर कासार तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी पशु पक्ष्यांची तहाण भूक जाणून घेत आता गावोगावी झाडाला पाणी व चारा ठेऊन पाखरांची पाखरण केली