शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

अंबाजोगाईत चार मुलांच्या मातेस फूस लावून पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 19:37 IST

दाम्पत्याच्या मुकबधीर मुलीने तिच्या आईला एकाने नेल्याचे सांगितले

अंबाजोगाई : एका विवाहित मुलीसह चार अपत्यांची आई असलेल्या ३५ वर्षीय विवाहितेस एकाने फूस लावून पळवून नेले. २१ डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेत बुधवारी (दि.३०) अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  याप्रकरणी अपह्रत विवाहितेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना तीन मुली आणि एका मुलगा आहे. त्यापैकी मोठ्या मुलीचे लग्न झालेले असल्याने घरात सध्या दोन मुली आणि मुलासह हे दाम्पत्य राहते. दि. २१ रोजी पती काही कामानिमित्त येरमाळा येथे गेला होता. रात्री ९ वाजता परतल्यावर त्याला घरात पत्नी दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही न सापडल्याने पतीने २३ डिसेंबर रोजी अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात पत्नी हरवल्याबाबत तक्रार दिली. 

दरम्यान, बुधवारी (दि.३०) या दाम्पत्याच्या मुकबधीर मुलीने तिच्या आईला ज्ञानेश्वर यादवराव बनसोडे (रा. राक्षसवाडी, ता. अंबाजोगाई) याने घरासमोरून घेऊन गेल्याचे वडिलांना खाणाखुणा करून सांगितले. सदर फिर्यादीवरून ज्ञानेश्वर बनसोडे याच्यावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी गुट्टे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणBeedबीड