शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

नियतीचा क्रूर खेळ! गोपीनाथ मुंडे, विनायक मेटेंनंतर अजितदादांच्या रुपाने बीड पोरकं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 14:25 IST

Ajit Pawar Death: बीड जिल्ह्याने यापूर्वी दोनदा असाच भीषण आघात सोसला आहे.

बीड : महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा माणूस’ आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. बीड जिल्ह्यासाठी हा प्रसंग केवळ एक राजकीय हानी नसून, नियतीने पुन्हा एकदा केलेली क्रूर थट्टा ठरली आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे, विनायक मेटे आणि आता अजित पवार या तीनही मोठ्या नेत्यांचा प्रवास अपघातानेच संपल्याने बीड जिल्हा पोरका झाला आहे.

बीड जिल्ह्याने यापूर्वी दोनदा असाच भीषण आघात सोसला आहे. ३ जून २०१४ रोजी, केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर भाजपचे गोपीनाथराव मुंडे पहिल्यांदाच जिल्ह्याकडे येत होते. अख्खा जिल्हा स्वागतासाठी सजला असताना, दिल्लीत त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि जिल्ह्यावर शोककळा पसरली. त्यानंतर १४ ऑगस्ट २०२२ रोजी, मराठा आरक्षणाच्या लढ्यातील बुलंद आवाज शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला. मेटे देखील समाजाच्या हक्कासाठी मुंबईकडे धाव घेत होते.

बीडशी जडलेले दादांचे नातेअजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असले तरी, बीडचे पालकमंत्री म्हणून त्यांनी अल्पावधीतच जिल्ह्याशी घट्ट नाते निर्माण केले होते. प्रशासकीय शिस्त आणि विकासाचा धडाका यामुळे बीडचा कायापालट होईल, अशी मोठी आशा जनतेला होती. ‘बीडची बारामती करू,’ हा त्यांचा शब्द जिल्ह्यासाठी नवा आत्मविश्वास देणारा ठरला होता. मात्र, गोपीनाथ मुंडे आणि विनायक मेटेंप्रमाणेच अजितदादांचा प्रवासही नियतीने अपघाताच्या वळणावर थांबवला.

पहाटेच येतात अपघाताच्या बातम्याबुधवारी सकाळी डोळे उघडताच मोबाइलवर धडकलेल्या अजित पवारांच्या विमान अपघाताच्या बातमीने बीड जिल्हा हादरला. यापूर्वी गोपीनाथ मुंडे आणि विनायक मेटे यांच्या निधनाची वार्ताही अशीच पहाटे आली होती. सुरुवातीला कुणाचाच विश्वास बसला नाही. मात्र, फोनाफोनी करून खात्री पटताच जिल्ह्यावर शोककळा पसरली. नियतीच्या क्रूर खेळामुळे बीडने पुन्हा एकदा आपला हक्काचा ‘पालक’ गमावला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy strikes Beed: Ajit Pawar's death follows Munde, Mete's accidents.

Web Summary : Beed mourns Ajit Pawar's sudden death, reminiscent of Gopinath Munde and Vinayak Mete's accidental demise. The district feels orphaned, losing a promising leader who aimed to transform Beed. Earlier deaths also arrived with morning news.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस