शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेती खरडली, भरपाई मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST

प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीला खो अंबाजोगाई - अंबाजोगाई शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर आजही ...

प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीला खो

अंबाजोगाई - अंबाजोगाई शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर आजही सर्रासपणे सुरूच आहे. शासनाने बंदी घातल्यानंतर प्लास्टिकच्या वापराला आळा बसणे आवश्यक आहे. पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टिक वापरामुळे जमिनीचे मोठे नुकसान होत आहे व पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. तरी प्लास्टिक बंदीचे गांभीर्य नागरिकांनी बाळगावे.

पाटबंधारे विभागात अनेक पदे रिक्त

अंबाजोगाई - अंबाजोगाई तालुक्यात पाटबंधारे विभागातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्त झाले आहेत. कर्मचारी मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्त झाल्याने जे कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांच्यावर कामाचा मोठा ताण वाढला आहे. परिणामी कामे वेळेवर होत नाहीत. पाटबंधारे विभागात रिक्त असलेली पदे तत्काळ भरावीत व हा विभाग सक्रिय करावा, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.

सुधारित वेतनाची प्रतीक्षा

अंबाजोगाई - ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हा निर्णय घेऊन बराच कालावधी लोटला तरी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याबाबत शासनाने या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी केली नाही. ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना हे सुधारित वेतन लागू करावे व त्यांच्यावरील अन्याय दूर करावा.

घरकूल लाभार्थी अनुदानापासून वंचित

अंबाजोगाई - दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या लाभार्थींना हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाच्या वतीने विविध घरकूल योजना राबविण्यात येत आहेत. तालुक्यातील मुडेगाव, राडी, दैठणा, आपेगाव, राडीतांडा, तडोळा या परिसरातील अनेक लाभार्थींना अजूनही अनुदान मिळाले नाही. या परिसरातील लाभार्थींना अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक कदम यांनी केली आहे.

अंबाजोगाईत घरफोड्यांचे प्रमाण वाढले

अंबाजोगाई - अंबाजोगाई शहर व परिसरात घरफोड्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. घराला कुलूप दिसल्यानंतर घरफोड्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रिंगरोड, पोखरीरोड या परिसरात घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनाकडे दाद मागण्यांचा प्रयत्न केला असता, उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने पोलिसांत तक्रार करणेही नागरिक टाळू लागले आहेत.