शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

श्रीपतरायवाडीत होणार कृषी संजीवनीची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST

फोटो लोखंडी सावरगाव : अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथून जवळच असलेल्या श्रीपतरायवाडी येथे नानाजी देशमुख कृषी ...

फोटो

लोखंडी सावरगाव : अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथून जवळच असलेल्या श्रीपतरायवाडी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात आला असून ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

गावात पाण्याच्या ताळेबंदानुसार मृदा व जलसंधारणाची कामे करण्यासाठी संरक्षित सिंचन, शेती उपयोगी अवजारे, पाण्याचा वापर, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, वैयक्तिक लाभाच्या योजना आदींबाबतचे नियोजन करण्यासाठी दत्तात्रय मुळे, उपक्रम अधिकारी शरद शिनगारे, तालुका कृषी अधिकारी गोविंद ठाकूर , प्रकल्प सहाय्यक प्रताप मुंडे, आर. डी. बर्वे, सुरेश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म आराखडा तयार करण्यात आला. ग्रामस्थांनी सूक्ष्म नियोजन संदर्भातील बाबी, जलमृदा व संधारणाचे महत्त्व समजून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पोखरा प्रकल्पांतर्गत येणार्‍या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच सूर्यकांत माने, प्रकल्प समन्वयक शिव प्रसाद येळकर, सुशांत धावरे, दशरथ उबाळे, ए. ए. तट यांनी केले.

कार्यक्रमाला तलाठी आर. जे. ननावरे, पशुवैद्यकीय अधिकारी पी. आर. धनवे, ग्रामसेवक लाखे, मुख्याध्यापक राजेसाहेब सरदेशमुख, उपसरपंच अश्विनी पवार, अप्पाराव तारळकर, गणेश पवार, रोहित माचवे, आकाश तारळकर, पांडुरंग माने, मुकुंद शिंदे, शंकर माने, मोहन पवार, हनुमंत मानेंसह ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गटाच्या अध्यक्ष, सचिव व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

-------

लोकसहभागातून होणार कामे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, ग्रामस्थांच्या मदतीने गावात प्रभातफेरी काढून लोकसहभागासाठी जनजागृती करण्यात आली. हनुमान मंदिरासमोर बचतगटाच्या महिलांनी गावचा नकाशा काढून गावातील उपलब्ध संसाधनांबाबत चर्चा केली. तर आराखड्याचे नियोजन केल्यानंतर शिवार फेरी काढण्यात आली.