धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर सुरेश धस मस्साजोगमध्ये, धनंजय देशमुखांसोबत कोणत्या विषयावर चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 10:43 IST2025-02-22T10:40:59+5:302025-02-22T10:43:10+5:30
Suresh Dhas Latest News: धनंजय मुंडे यांच्यासोबतच्या भेटीमुळे टीका झाल्यानंतर आज भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांशी चर्चा केला.

धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर सुरेश धस मस्साजोगमध्ये, धनंजय देशमुखांसोबत कोणत्या विषयावर चर्चा?
Suresh Dhas Marathi News: संतोष देशमुख हत्या, पिकविमा घोटाळ्यावरून धनंजय मुंडे यांना घेणाऱ्या आमदार सुरेश धसांनी गेल्या आठवड्यात धनंजय मुंडेंची बंद खोलीत भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. टीका होत असतानाच सुरेश धसांनी पुन्हा धनंजय मुंडेंविरोधात गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, शनिवारी सुरेश धस यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मस्साजोगच्या ग्रामस्थांशीही चर्चा केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांच्यावर विश्वासघात केल्याची टीका झाली. टीका होत असतानाच सुरेश धस यांनी मयत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची भेट घेतली.
सुरेश धस आणि धनंजय देशमुखांमध्ये काय झाली चर्चा?
सुरेश धस यांनी धनंजय देशमुख यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्याचवेळी मस्साजोगमधील ग्रामस्थांनीही गुंड आणि पोलिसांमध्ये असलेल्या मिलीभगत याबद्दल प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांची बदली केली, हे मान्य आहे. पण, खालच्या पोलीस अधिकाऱ्यांचं काय? असा प्रश्न धनंजय देशमुख यांनी धसांना केला.
पोलीस उप अधीक्षकांसह पोलीस प्रशासनातील सगळे अधिकारी यांचे मित्र आहेत, असे धनंजय देशमुख म्हणाले. तर सगळ्यांच्या बदल्या कराव्या लागतील अशी मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केली. यांची बदली करून होणार नाही, यांना शिक्षा भेटली पाहिजे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
पोलीस उप अधीक्षक, अतिरिक्त पोलीस उपअधीक्षक यांची मला यादी द्या, असे सुरेश धस यांनी सांगितले.
धनंजय देशमुख म्हणाले, 'आम्ही त्या गीते मॅडमला म्हणालो होतो की, आरोपी विष्ण चाटेचा फोन चालू आहे, एक कॉल करा. त्यांनी माझ्यासमोर एकदा फोन करायचा ना. त्यांनी केला नाही. विष्णू चाटेचा त्यादिवशी फोन चालू होता. त्यानंतर थेट टाकीवर आम्ही आंदोलन केलं, त्यादिवशी त्या आम्हाला दिसल्या. 36 दिवसांनी."
आम्ही काहीच ऐकणार नाही
"या अधिकाऱ्यांच्या दोन-तीन दिवसांत बदल्या झाल्या पाहिजे. कारण हे सगळे सराईत आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर २५ तारखेनंतर आम्ही कुणाचंच काही ऐकणार नाही. आरोपीला अटक करणे महत्त्वाचे आहे. कृष्णा आंधळे यांना सापडत नाहीये, तो सराईत आहे", असे धनंजय देशमुख आणि ग्रामस्थ सुरेश धस यांना म्हणाले.
'तो वायभसे डॉक्टर माणसांचा आहे की, जनावरांचा आहे. तो मुकादम कसा होतो? तो पैसे वाटायला होता. पोलीस अधिकारी महाजन आणि वायभसे यांना सहआरोपी केले पाहिजेत. वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार अशी', भूमिका धस यांनी यावेळी मांडली.