सराफा दुकानात चोरट्यांची हातचलाखी; सोन्याचा महागडा दागिना खिशात टाकून झाले पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 19:45 IST2024-10-15T19:43:55+5:302024-10-15T19:45:25+5:30

या घटनेमुळे सराफा बाजारात खळबळ उडाली आहे.

after engaged the shopkeeper in talking the expensive gold ornament was looted | सराफा दुकानात चोरट्यांची हातचलाखी; सोन्याचा महागडा दागिना खिशात टाकून झाले पसार

सराफा दुकानात चोरट्यांची हातचलाखी; सोन्याचा महागडा दागिना खिशात टाकून झाले पसार

माजलगाव( बीड): शहरातील बीड रोडवर असलेल्या देशमुख सराफ या दुकानातून दोन अज्ञात चोरट्यांनी हातचलाखी करून ५० हजार रुपयांचे सोने लांबवल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहर पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बीड रोडवरील व्यंकटेश कॉम्प्लेक्स मधील देशमुख सराफ या सोने-चांदीच्या दुकानात मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी प्रवेश केला. त्यांनी दागिने बघण्याच्या बहाण्याने सोन्याचे कानातील दागिने दाखविण्यास सांगितले. दागिने दाखविणाऱ्या दुकानदारास बोलण्यात गुंतवून ठेवत एकाने हातचलाखीने सात ग्रॅम वजनाचे दोन कानातले अलगद आपल्या खिशात टाकले. त्यानंतर चोरटे पसार झाले.

शंका आल्याने सराफ दुकानदार सुधाकर देशमुख यांनी तात्काळ एका बॉक्सचे वजन केले असता ते कमी भरल्याने त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. बाहेर येऊन पाहिले असता चोरटे आपल्या साथीदारांसह दोन मोटर सायकलवर पसार झाले होते. या घटनेनंतर त्यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशनला सर्व प्रकार सांगून व घटनेचे व्हिडिओ पोलिसांना सुपूर्द करत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार शिवाजी तळेकर हे पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे सराफा बाजारात खळबळ उडाली आहे.

Web Title: after engaged the shopkeeper in talking the expensive gold ornament was looted