सुदाम मुंडेला औषध पुरविणाऱ्याचा परवाना रद्द करण्याच्या हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 02:47 IST2020-10-05T02:47:06+5:302020-10-05T02:47:13+5:30
गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी सुदाम मुंडे याने जामिनावर बाहेर येताच रामनगर परिसरात आपले दुकान थाटले होते.

सुदाम मुंडेला औषध पुरविणाऱ्याचा परवाना रद्द करण्याच्या हालचाली
बीड : गर्भपात प्रकरणात शिक्षा झालेल्या परळीतील सुदाम मुंडे याला मागील चार महिन्यांपासून औषध पुरविणारा मेडिकल चालक औषध प्रशासनाच्या रडारवर आहे. त्याला नोटीस बजाविल्यानंतर त्याचा परवाना रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी सुदाम मुंडे याने जामिनावर बाहेर येताच रामनगर परिसरात आपले दुकान थाटले होते. आरोग्य, पोलीस व महसूलच्या पथकाने छापा मारून त्याचा हा गोरखधंदा चव्हाट्यावर आणून त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.
संबंधिताला नोटीस बजावली आहे. त्याचा जबाबही मिळाला आहे. योग्य त्या चौकशीनंतर परवाना रद्दची कारवाई केली जाणार असल्याचे औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त रामेश्वर डोईफोडे यांनी सांगितले.
दवाखान्यात औषधांचा साठा, यंत्र, उपकरणे, रुग्ण अशा अनेक संशयास्पद बाबी निदर्शनास आल्या होत्या.