धक्कादायक! घराबाहेर काढण्यासाठी भावाच्या कुटुंबावर अ‍ॅसिड हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 16:20 IST2019-05-04T16:06:48+5:302019-05-04T16:20:20+5:30

'हे घर आम्ही विक्रीला काढले आहे, तू घराबाहेर निघ' असं म्हणत भावाच्या पत्नीसह तिचे दोन भाऊ व लहान मुलांवर अ‍ॅसिड फेकून हल्ला केल्याची घटना धक्कादायक घटना समोर आली आहे.

Acid attack on brother's family to leave the house in majalgaon | धक्कादायक! घराबाहेर काढण्यासाठी भावाच्या कुटुंबावर अ‍ॅसिड हल्ला

धक्कादायक! घराबाहेर काढण्यासाठी भावाच्या कुटुंबावर अ‍ॅसिड हल्ला

ठळक मुद्दे'हे घर आम्ही विक्रीला काढले आहे, तू घराबाहेर निघ' असं म्हणत भावाच्या पत्नीसह तिचे दोन भाऊ व लहान मुलांवर अ‍ॅसिड फेकून हल्ला केल्याची घटना धक्कादायक घटना समोर आली आहे.शुक्रवारी रात्री 11.30 वा. दरम्यान माजलगाव शहरातील कालिका नगर येथे ही घटना घडली.  घरगुती भांडणाच्या कारणावरून हल्ला झाला असून आरोपी विरोधात माजलगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजलगाव - 'हे घर आम्ही विक्रीला काढले आहे, तू घराबाहेर निघ' असं म्हणत भावाच्या पत्नीसह तिचे दोन भाऊ व लहान मुलांवर अ‍ॅसिड फेकून हल्ला केल्याची घटना धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री 11.30 वा. दरम्यान माजलगाव शहरातील कालिका नगर येथे ही घटना घडली. घरगुती भांडणाच्या कारणावरून हल्ला झाला असून आरोपी विरोधात माजलगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कालिका नगर येथील रहिवासी अहमद जैनुद्दीन जर्गर व नजीब जैनुद्दीन जर्गर यांच्या घरी इर्शाद जर्गर यान्ना माजलगाव शहरातील बाजार रोड येथील शेख महेबुब यांची मुलगी दिली होती. या उभयतांना आठ वर्षीय व पंधरा वर्षीय अशी दोन मुले असून कुटूंब कालिका नगर येथे एकत्रित कुटुंबात स्वतः च्या घरात राहते. परंतु या घरावर कब्जा करून लहान भाऊ इर्शाद जर्गर यांना घराबाहेर काढण्यासाठी शुक्रवारी रात्री 11.30 वा. दरम्याण अहमद जर्गर व नजीब जर्गर यांनी वाद घालून भांडण करण्यास सुरुवात केली. घराबाहेर हे घर आम्हाला विकायचे आहे, असे म्हणून घरातील वाद सोडवण्यासाठी गेलेली महिलेचे भाऊ समीर शेख मेहबूब शेख (वय 35 वर्षे) शेख मकसूद (वय 38 वर्षे), दिना इर्शाद जर्गर (वय 8 वर्षे) व अलशफात इर्शाद जर्गर (वय 15 वर्षे) यासह रेश्मा ईर्शाद जर्गर (वय 33 वर्षे) यांच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला.

शहरातील कालिका नगर परिसरात शुक्रवारी रात्री 11.30 वा. दरम्यान ही घटना  घडली. या हल्यात समीर शेख हा युवक गंभीर जखमी झाला आहे. तसेच इतरांना अ‍ॅसिडमुळे इजा झाली आहे. दरम्यान आरोपी विरोधात माजलगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक सय्यद सुलेमान हे करत आहे. या प्रकरणातील आरोपी हा सोन्याच्या कारागिरीचा व्यवसाय करणारा आहे. त्याकरिता त्यांच्याकडे सोन्याला झळाळी देण्यासाठी तेजाब वापरण्यात येते. परंतू त्यांने घरातील भांडणासाठी या तेजाबचा वापर करून जीवघेणा हल्ला केला असल्याचे समजते.

 

Web Title: Acid attack on brother's family to leave the house in majalgaon