टाकी सफाईवरुन कोयत्याने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 01:19 IST2019-01-21T01:18:59+5:302019-01-21T01:19:18+5:30
जिल्ह्यातील वडवणी येथे टाकी साफ करण्याच्या कारणावरुन एकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला.

टाकी सफाईवरुन कोयत्याने हल्ला
बीड : जिल्ह्यातील वडवणी येथे टाकी साफ करण्याच्या कारणावरुन एकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला.
वडवणीच्या गोपाळनगर येथे गंगाधर सखाराम बारटक्के नामक दुकानदार राहतात. त्यांच्यासमोरच पांडुरंग बारटक्के राहतात. पांडुरंग यांनी आपल्या घरासमोर बोअर घेतला आहे. या बोअरचे आॅईल पाण्याच्या टाकीवर पडले. ही पाण्याची टाकी साफ करुन द्या, असे म्हणताच गंगाधर यांच्यावर पांडुरंग यांनी कोयत्याने हल्ला केला. शुभम बारटक्के याने लोखंडी दांड्याने हातापायावर मारहाण केली. तसेच रेखा बारटक्के हिने शिवीगाळ केली. या सर्व आरोपींनी गंगाधर यांना जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना १९ जानेवारी रोजी घडली असून, तिघांविरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.