विटा घेऊन जाताना टेम्पोला अपघात; १ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 00:16 IST2020-01-08T00:15:26+5:302020-01-08T00:16:09+5:30

शहराजवळ असलेल्या विट भट्टीवरून विटाने भरलेला टेम्पो भगवानगडाच्या दिशेने जात होता. यावेळी टेम्पो उलटला. यामध्ये बसलेल्या एकाचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले.

Accidental tempo with bricks; 1 killed | विटा घेऊन जाताना टेम्पोला अपघात; १ ठार

विटा घेऊन जाताना टेम्पोला अपघात; १ ठार

बीड : शहराजवळ असलेल्या विट भट्टीवरून विटाने भरलेला टेम्पो भगवानगडाच्या दिशेने जात होता. यावेळी टेम्पो उलटला. यामध्ये बसलेल्या एकाचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बीड येथील वीटभट्टीवरील टेम्पो (क्र. एमएच ४१ जी १०४२ ) हा टेम्पो विटा घेऊन मजुरांसह भगवानगडाकडे जात होता. यावेळी मादळमोही जवळील तांदळा गावाजवळ समोरून येणाऱ्या टिप्परने (क्र. एमएच २० बी.टी ३२८४) ने टेम्पोला कट मारला. यावेळी टेम्पोवरील चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो उलटला. यावेळी मजूरांच्या अंगावर विटाचा ढिगारा पडला. या अपघातात शेख सरफराज शेख सादेक ( रा. मोमीनपूरा बीड शहर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रवींद्र गायकवाड ( खंडेश्वरी परिसर, बीड), शेख अन्सार दस्तागीर (बीड मामला), आणि शेख शमशेर शेख नजीर हे गंभीर जखमी आहेत. यावेळी नागरिकांनी मदत करत तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्ण्लायात पाठवण्यात आले होते. यापैकी एकाजी प्रकृती चिंताजनक असून त्यांना औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे. याघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Accidental tempo with bricks; 1 killed