परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू; गढी- माजलगाव मार्गावर दोन दुचाकींची धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 14:07 IST2023-03-28T14:06:43+5:302023-03-28T14:07:18+5:30
दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू; गढी- माजलगाव मार्गावर दोन दुचाकींची धडक
गेवराई : तालुक्यातील गढी-माजलगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर अर्धमसला फाट्याजवळ आज सकाळी १० वाजता दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी आहेत. कृष्णा विठ्ठल गायकवाड ( २७, रूई ) असे मृताचे नाव आहे.
रूई येथील कृष्णा विठ्ठल गायकवाड याची गढी येथील महाविद्यालयात आज सकाळी परिक्षा होती. यासाठी तो दुचाकीवरून ( क्रमांक एम.एच २० एफ.जे ११५१ ) गढीकडे येत होता. दरम्यान, अर्धमसला फाट्याजवळ समोरून आलेल्या दुचाकीसोबत ( क्रमांक एम.एच २३ ए.एल ५१६३ ) कृष्णाच्या दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली. यात कृष्णाचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी इतर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांची ओळख पटली नाही. त्यांना बीड येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. मृत तरूण छत्रपती संभाजीनगर येथे एका खाजगी कंपनीत कामाला होता. परीक्षा असल्याने तो आठ दिवसांपूर्वी गावी आला होता.