बीडच्या स्त्री रोग तज्ज्ञाचा पाचोडजवळ अपघात, दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 13:13 IST2022-06-18T13:11:56+5:302022-06-18T13:13:11+5:30
ताबा सुटल्याने गाडी रस्त्यच्या खाली उतरली

बीडच्या स्त्री रोग तज्ज्ञाचा पाचोडजवळ अपघात, दोघे गंभीर जखमी
बीड : येथील जिल्हा रूग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ आपल्या चार चाकी वाहनातून औरंगाबादला जात होते. पाचोडजवळ गाडीवर (mh 23 as 9294) नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली गेली. गाडीने पलट्या मारल्याने डॉक्टरसह अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही औरंगाबादच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे.
डॉ. रामेश्वर आवाड असे जखमी डॉक्टरचे नाव आहे. डॉ.आवाड हे जिल्हा रूग्णालयात कार्यरत असून आज सकाळीच औरंगाबादला आपल्या चारचाकी वाहनातून जात होते. पाचोडजवळ त्यांच्या स्टेअरींगवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी रस्त्याच्या खाली गेली. गाडीने पलटी मारल्याने गाडीचा चुरा झाला होता.
याच गाडीत डॉ.आवाड यांचे ओळखपत्रही सापडले आहे. ते औरंगाबादला कशासाठी जात होते आणि आणखी सोबत कोण होते, हे मात्र समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे हे देखील औरंगाबादकडे रवाना झाले आहेत.