मशागतीच्या कामांना शेतकऱ्यांकडून वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:35 IST2021-03-27T04:35:33+5:302021-03-27T04:35:33+5:30
रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहनधारक त्रस्त अंबाजोगाई : शहरातील शेपवाडी परिसर ते यशवंतराव चव्हाण चौक या रस्त्याचे काम सुरू आहे. गेल्या ...

मशागतीच्या कामांना शेतकऱ्यांकडून वेग
रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहनधारक त्रस्त
अंबाजोगाई : शहरातील शेपवाडी परिसर ते यशवंतराव चव्हाण चौक या रस्त्याचे काम सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे काम सुरू असल्याने ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. एका बाजूने रस्ता खोदल्याने दुसऱ्या बाजूने वाहने जातात. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे दुचाकी चालक व चारचाकी चालक त्रस्त झाले आहेत. बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम लवकर मार्गी लावून हा रस्ता नागरिकांसाठी खुला करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील मुथा यांनी केली आहे.
पांदण रस्त्याची मागणी
बीड : तालुक्यातील पालसिंगन येथील शेतात जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून वेळोवेळी मागणी करून देखील रस्त्याची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून पांदण रस्त्याचे काम करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.