शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

अबब, महावितरण कार्यालयांचेच नाही इलेक्ट्रिक ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:27 IST

बीड : प्रत्येक शासकीय कार्यालयाचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट होणे आवश्यक असते. परंतु बीडमध्ये चक्क महावितरण कार्यालयानेच आपल्या कार्यालयाचे ...

बीड : प्रत्येक शासकीय कार्यालयाचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट होणे आवश्यक असते. परंतु बीडमध्ये चक्क महावितरण कार्यालयानेच आपल्या कार्यालयाचे इलेक्ट्रिक ऑडिट केले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १५ कार्यालयातील जवळपास दीड हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

जिल्ह्यात बीड मंळड कार्यालयांसह बीड व अंबाजोगाई असे दोन विभाग आणि बीड शहर, बीड ग्रामीण, गेवराई, पाटोदा, शिरूरकासार, आष्टी, तेलगाव, परळी, अंबाजोगाई, माजलगाव, धारूर, केज असे १२ उपविभागीय कार्यालये आहेत. यामध्ये १३७८ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. या कार्यालयांची अवस्था अतिशय बिकट झालेली दिसते. नुकतीच भंडारा येथील दुर्दैवी घटनेनंतर शासनाने प्रत्येक रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट करण्याचे आदेश दिले. हाच धागा पकडून लोकमतने महावितरण कार्यालयांनीच इलेक्ट्रिक ऑडिट केले का, याची माहिती घेतली असता एकाही कार्यालयाचे ऑडिट झाले नसल्याचे समोर आले.

दरम्यान, बीड शहरातील माळीवेस उपविभागीय कार्यालयात पाहणी केली असता सर्वत्र वायर मोकळे आहेत. ठिकठिकाणी जोड व्यवस्थित नाहीत. त्यामुळे कोणत्याही वेळी शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढे गंभीर असतानाही महावितरणकडून याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे.

कोट

चालू वर्षांत कार्यालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट झालेले नाही. चार-दोन दिवसांत इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरकडून इलेक्ट्रिक ऑडिट करून घेऊ. फायर ऑडिटचे यापूर्वीच कंत्राट काढले होते. परंतु काम न केल्याने संबंधितांवर योग्य ती कारवाई झाली आहे. आता पुन्हा नव्याने प्रक्रिया केली जाईल.

रविंद्र कोळप

अधीक्षक अभियंता, महावितरण बीड

----

जिल्ह्यातील एकूण अधिकारी, कर्मचारी - १,३७८

जिल्ह्यातील एकूण कार्यालये - १५