मजुरांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर; घरी परतणाऱ्या तीन मजुरांना कारने चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 21:59 IST2023-02-01T21:58:51+5:302023-02-01T21:59:12+5:30

तिघेही मजूर एकाच गावातील रहिवासी होते

A mountain of grief on the laborer's family; Three laborers returning home were crushed by a car | मजुरांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर; घरी परतणाऱ्या तीन मजुरांना कारने चिरडले

मजुरांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर; घरी परतणाऱ्या तीन मजुरांना कारने चिरडले

- संतोष स्वामी
दिंदृड ( बीड): माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीत कार आणि दुचाकी अपघातात तीन तरुण ठार झाल्याची घटना आज रात्री आठ वाजे दरम्यान घडली. मृत तिघेही मजूर असल्याची माहिती असून काम संपल्यानंतर ते दुचाकीवरून घरी परतत होते. 

लहामेवाडी येथील तीन तरुण लक्ष्मण सुभाष कापसे (वय ३६ वर्ष),नितीन भाऊसाहेब हुलगे (वय ३० वर्ष ),अण्णा बळीराम खटके (वय 27 वर्ष) तेलगाव येथील जिनिंगवर मजुरीचे काम करतात. आज सायंकाळी काम संपल्यानंतर तिघेही एकाच दुचाकीवर गावाकडे परत निघाले. माजलगाव-तेलगाव हायवेवरील नित्रुड पासून तीन किमी अंतरावर एक भरधाव कारनसोबत दुचाकीची धडक झाली. 

अपघात इतका भीषण होती की, दोघे मजूर जागेवरच ठार झाले. दरम्यान एक जणांना उपचारार्थ माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. दरम्यान, चालक कारसह दिंद्रुड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

Web Title: A mountain of grief on the laborer's family; Three laborers returning home were crushed by a car