भावडांसोबत खेळणाऱ्या चिमुकलीचा खड्यातील पाण्यात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 17:29 IST2022-08-25T17:29:11+5:302022-08-25T17:29:31+5:30

राखेच्या तळ्यापासून केवळ शंभर मीटर अंतरावर राहणाऱ्या कुटुंबावर शोककळा

A child who was playing with his siblings drowned in the water | भावडांसोबत खेळणाऱ्या चिमुकलीचा खड्यातील पाण्यात बुडून मृत्यू

भावडांसोबत खेळणाऱ्या चिमुकलीचा खड्यातील पाण्यात बुडून मृत्यू

परळी (बीड) : तालुक्यातील दाऊतपुर रोडवर खेळताना ३ वर्षीय चिमुकलीचा राख साठवणूक जागे जवळील पाण्याच्या खड्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. आरुक्षी साईनाथ पवार असे मृत मुलीचे नाव आहे.

परळी -गंगाखेड रस्त्यांवरील औष्णिक विद्युत केंद्राचे राख साठवणूक तळे आहे. राखेच्या तळ्यापासून केवळ शंभर मीटर अंतरावर पवार कुटुंब राहते. आज सकाळी पवार कुटुंबातील तीन भावंडं खेळत खेळत राखेच्या तलावाजवळ पोहचले.  त्याठिकाणी असलेल्या खड्ड्याजवळ आरुक्षी व तिची दुसरी बहीण खेळू लागले. अचानक आरुक्षी खड्ड्यातील पाण्यात पडली. हे दृश्य पाहताच मोठ्या भावाने घर गाठून पालकांना माहिती दिली. त्यानंतर वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली. खड्ड्यातून आरुक्षीला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

Web Title: A child who was playing with his siblings drowned in the water