परळीतून १२ जणांची माघार १६ मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:31 IST2019-10-08T00:30:51+5:302019-10-08T00:31:24+5:30

परळी विधानसभा मतदार संघाच्या होत असलेल्या निवडणुकीतून १२ जणांनी माघार घेतल्याने १६ उमेदवार रिंगणात आहेत.

5 people retreat from Parli | परळीतून १२ जणांची माघार १६ मैदानात

परळीतून १२ जणांची माघार १६ मैदानात

परळी विधानसभा मतदार संघाच्या होत असलेल्या निवडणुकीतून १२ जणांनी माघार घेतल्याने १६ उमेदवार रिंगणात आहेत. बद्रुद्दीन बाबुमियॉं शेख, मतीन समदानी शेख, सुलेमान खैरोद्दीन महंमद, मुस्तफा मैनुद्दीन शेख, राजश्री धनंजय मुंडे, अशोक संतराम ताटे, स. इब्राहीम सय्यद, जावेद उस्मान शेख, सरमतखान सुफिखान, लिंबाजी अंबाजी मुंडे, रसुलखान अफसर खान पठाण, फेरोज शेख यांनी उमेदवारी मागे घेतली.
तर भाजपच्या पंकजा मुंडे, राष्टÑवादी कॉँग्रेसचे धनंजय मुंडे, वंचित बहुजन आघाडीचे भीमराव सातपुते यांच्यासह भागवत वैद्य, अनंत गायकवाड, सादिक मुनीरत्न शेख, नबी साहाब साहाब सय्यद, सिराजोद्दीन काझी, हिदायत सादेक सय्यद अली, एजाज बाबर इस्माईल शेख, रईसोददीन जलालोद्दीन पठाण, फिरोजखान पठाण खैराती खान, प्रविण सोपान मस्के, भागवत रामकृष्ण काकडे, धनंजय सदाशिवराव देशमुख, डॉ.वसंत रघुनाथ मुंडे हे उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
उमेदवारांना प्रचारास अवघे चौदा ते पंधरा दिवस मिळणार असल्यामुळे उमेदवारांची लगबग सुरू झाली असून, प्रत्यक्ष उमेदवारांच्या भेटीगाठीवर उमेदवार भर देत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: 5 people retreat from Parli