बीड : बीड, जालना आणि औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी चालविलेल्या कोम्बिंग आॅपरेशनमध्ये ३९ गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले. तिन्ही जिल्ह्यांतर्गत गोदावरी नदीकाठच्या गुन्हेगारी वस्त्यांमध्ये शनिवारी दुपारपासून ते रविवारी पहाटे ६ वाजेपर्यंत हे कोम्बिंग आॅपरेशन करण्यात आले.तीन जिल्ह्यांतील एकूण ४४ गुन्हेगारी वस्त्यांची झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत ८ वॉन्टेड आरोपी, अजामीनपात्र वॉरंटमधील ७, माहितगार गुन्हेगार ४, दोन हिस्ट्री शीटर पकडण्यातआले. ७ संशयित वाहने ताब्यात घेण्यात आली, तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या १८ जणांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत २१ अधिकारी, १२८ कर्मचारी, तसेच २१ शासकीय वाहनांचा ताफा होता.
कोम्बिंग आॅपरेशनमध्ये ३९ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 05:06 IST