केजमध्ये ५१ हजार रुपयांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 00:17 IST2019-08-24T00:17:15+5:302019-08-24T00:17:46+5:30
अज्ञात चोरट्यांनी घर फोडून दागिन्यांसह ५१ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शहरातील समता नगर भागात गुरु वारी मध्यरात्री घडली.

केजमध्ये ५१ हजार रुपयांची घरफोडी
केज : अज्ञात चोरट्यांनी घर फोडून दागिन्यांसह ५१ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शहरातील समता नगर भागात गुरु वारी मध्यरात्री घडली. येथील काँग्रेसचे शहराध्यक्ष हाजीमौला सौदागर हे गुरुवारी पुण्याहुन केजकडे प्रवास करत होते. घरी त्यांची पत्नी, मुलगा आणि मुली होत्या. मध्यरात्री चोरट्यांनी बंगल्याच्या चैनल गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यांच्या बेडरूममध्ये घुसून लाकडी कपाटातील दोन तोळ्याचे सोन्याचे नेकलेस, कानातील सोन्याच्या रिंग जोड आणि नगदी पाच हजार रुपये असा ५१ हजार ८०० रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे आलेल्या रस्त्याने पसार झाले. सौदागर हे शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. शहानवाज हाजीमौला सौदागर यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार महादेव गुजर हे तपास करत आहेत.