तडोळीत ३ लाखांची घरफोडी; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:48 IST2019-07-11T00:47:43+5:302019-07-11T00:48:07+5:30

परळी तालुक्यातील तडोळी येथे बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून सोने, रोख रक्कम असे ३ लाख २१ हजार रुपायांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

3 Lakh burglary in Tadoli; Filed the complaint | तडोळीत ३ लाखांची घरफोडी; गुन्हा दाखल

तडोळीत ३ लाखांची घरफोडी; गुन्हा दाखल

ठळक मुद्देघराचे कुलूप तोडून चोरट्यांनी केला हात साफ

बीड : परळी तालुक्यातील तडोळी येथे बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून सोने, रोख रक्कम असे ३ लाख २१ हजार रुपायांचा मुद्देमाल लंपास केला आहे.या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील अशोक राजाभाऊ सिरसाट यांच्या घरावर चोरट्यांनी पाळत ठेवून बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी कोणालाही कुणकुण लागू न देता, घरातील कपाटाचे दार उघडून त्यामधील सोने, व रोख रक्कम लंपास केली. तसेच एका पेटी उचलून घेऊन गेले व ती एका वाड्यात नेऊन त्याचे देखील कुलूप तोडून रक्कम चोरी केली. यामध्ये एकूण ३ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध सिरसाट यांच्या फिर्यादीवरुन परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला अहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप.नी.जिरगे करत आहेत.
दरम्यान परळी तालुक्यात चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे, त्यामुळे या चोरट्यांवर कारवाई करत पोलिसांना अशा घटनांना पायबंद घालावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Web Title: 3 Lakh burglary in Tadoli; Filed the complaint