शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

वैद्यकीय अधिकारी ते संचालकांपर्यंतची २६८३ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST

सोमनाथ खताळ लोकमत न्यूज नेटवर्क बीड : राज्यात वैद्यकीय अधिकारी ते संचालक अशी ९ हजार ३७९ पदे आहेत. पैकी ...

सोमनाथ खताळ

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : राज्यात वैद्यकीय अधिकारी ते संचालक अशी ९ हजार ३७९ पदे आहेत. पैकी तब्बल २ हजार ६८३ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. ही पदे भरण्यासह पात्र अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याऐवजी शासन ठरावीक लोकांच्या हितासाठी निवृत्तीचे वय ६२ पर्यंत वाढविण्यात 'इंटरेस्ट' दाखवित आहे.

राज्यात वैद्यकीय अधिकारी ते संचालकांपर्यंत तब्बल ८ वेगवेगळी पदे आहेत. यात आरोग्य संचालकांसह अतिरिक्त संचालक, सहायक संचालक, उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, विशेष तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे. यात सर्वच पदांच्या जागा रिक्त असल्याचे दिसत आहे. मागील अनेक वर्षांपासून आरोग्य विभागाने पात्र असतानाही अधिकाऱ्यांना पदोन्नती दिलेली नाही. त्यातच सोमवारी एका आदेशाने जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील केवळ ३० अधिकाऱ्यांना पदोन्नतीने पदस्थापना दिलेली आहे; परंतु निवड मंडळ व पदोन्नतीने भरावयाच्या आणखी ६० जागा रिक्त आहेत. मंडळाने केवळ अर्ज मागविले आहेत; परंतु त्यावर निर्णय घेण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

दरम्यान, एकीकडे पात्र अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन नवख्या डॉक्टरांना संधी देऊन रिक्त पदे भरण्यास शासन अनुत्सुक असल्याचे दिसत आहे; पण ठरावीक अधिकाऱ्यांच्या हितासाठी न्यायालयाचा अवमान करत आणि कोरोनाचे कारण पुढे करीत निवृत्तीचे वय सुरुवातीला ५८ वरून ६० आणि आता ६० वरून ६२ केले आहे. हा लाभ १९३ अधिकाऱ्यांनाच होणार आहे. या मोजक्या अधिकाऱ्यांचे 'हितसंबंध' जपण्यासाठी शासन १० हजार डॉक्टरांच्या विरोधात जाऊन नवे शासन निर्णय काढत असल्याचे दिसत आहे. याविरोधात संघटना आक्रमक झाल्या असून, वय वाढविण्याचा निर्णय रद्द करण्यासह रिक्त पदे भरावीत, तसेच पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी करीत आहेत.

....

डीएचओ संघटना मंत्रालयात ठाण मांडून

न्यायालयाने निर्णय देऊनही शासनाने वय वाढविण्याचा निर्णय घेतला. याविरोधात जिल्हा आरोग्य अधिकारी संघटना आक्रमक झाली. मंगळवारी संघटनेचे पदाधिकारी मुंबईत जाऊन मंत्रालयात तळ ठोकून होते. आरोग्यमंत्री व प्रधान सचिवांना त्यांनी याबाबत लेखी निवेदनही दिले आहे. यावेळी राज्याध्यक्ष डॉ. आर. बी. पवार, सचिव डॉ. कपिल आहेर, डॉ. बाळासाहेब सोनवणे, डॉ. भगवान पवार, डॉ. विवेक खतगावर, महिला अध्यक्षा डॉ. बबिता कमलापूरकर, डॉ. संजय कदम आदींची उपस्थिती होती.

--

वय वाढविण्याच्या निर्णयाला आमचा पूर्ण विरोध आहे. पात्र असतानाही पदोन्नती देण्यासह रिक्त पदे भरून नवख्यांना संधी द्यावी. यामुळे आरोग्य विभागात नवचैतन्य येईल. आरोग्यमंत्री, प्रधान सचिवांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. आम्ही न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही.

-डॉ. आर. बी. पवार, अध्यक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटना, महाराष्ट्र

---

अशी आहेत रिक्त पदे...

आरोग्य संचालक २ पैकी १ रिक्त

अतिरिक्त संचालक ३ पैकी २

सहायक संचालक ११ पैकी ७

उपसंचालक २३ पैकी ११

जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग २८१ पैकी १४८

जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग ६४३ पैकी ३९६

विशेष तज्ज्ञ ६२७ पैकी ४७९

वैद्यकीय अधिकारी गट अ ७७८९ पैकी १६३९

एकूण ९३७९ पैकी २६८३ रिक्त