शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

१७ दिवसांच्या जुळ्या मुलींचा एकाचवेळी मृत्यू; बीडमधील घटनेत घातपाताचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 8:37 PM

दोघींचाही एकाचवेळी मृत्यू होणे, हे संशयास्पद आहे.

बीड/गेवराई : ताप आल्याने १७ दिवसांच्या जुळ्या मुलींचा एकाचवेळी मृत्यू झाला. ही घटना १३ मार्च रोजी घडली होती. परंतु हे प्रकरण संशयास्पद वाटल्याने आरोग्य, पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर बरोबर एका महिन्यानंतर म्हणजेच १३ एप्रिल रोजी हे दोन्ही मृतदेह बाहेर काढून त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.  या जुळ्या मुलींचा मृत्यू नेमका ताप आल्याने झाला की त्यांचा घातपात झाला? याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

गेवराई तालुक्यातील निपानी जवळका येथील अनिता कुंडलिक चव्हाण (२९) ही महिला गर्भवती असल्याने काठोडा तांडा येथे माहेरी आली होती. कळा येऊ लागल्याने तिला २५ फेब्रवारीला दुपारी १२ वाजता जिल्हा रूग्णालयात दाखल केले. रात्री ८.२० वाजता तिला शस्त्रक्रीया विभागात घेतले. यामध्ये तिचे सिझेरिअन झाले आणि तिने दोन गोंडस मुलींना जन्म दिला. आईची प्रकृती स्थिर होती मात्र दोन्ही मुलींचे वजन कमी असल्याने त्यांना एसएनसीयू विभागात दाखल केले. ३ एप्रिल रोजी अनिताला जिल्हा रूग्णालयातून सुट्टी झाली होती.

दरम्यान, आशा कार्यकर्तीने गावात जावून पाहणी केल्यानंतर अनिताच्या दोन्ही मुलींचे वजन आणखी कमी झाल्याचे दिसले. तिने रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यानंतर १२ एप्रिलच्या मध्यरात्री या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला. त्या दोघींनाही जवळच एक खड्डा करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हीच बाब काही दिवसांनी ताालुका आरोग्य अधिकाऱ्यांना समजली. त्यांनी याची चौकशी केली. चौकशी पूर्ण झाल्यावर याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई यांना पत्र पाठवून चौकशी करण्याची विनंती केली. त्यांनी तलवाडा पोलीस ठाण्याला पत्र पाठविले. तलवाड्याचे सपोनि मारोती मुंडे यांच्या खबरीवरून यामध्ये आकस्मात मृत्यूची नोंद झाली होती.

शनिवारी दुपारी तहसीलदार संगिता चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय कदम, डॉ.गुट्टे, सपोनि मारोती मुंडे, पोउपनि रघुविर मुºहाडे यांच्यासमक्ष हे दोन्ही मृतदेह तब्बल महिन्यानंतर बाहेर काढले. शवविच्छेदनासाठी ते मृतदेह सायंकाळी जिल्हा रूग्णालयात आणले होते.

घातपाताचा संशयअनिता यांना या अगोदर दोन्ही मुलीच आहेत. त्यानंतर पुन्हा त्यांना दोन जुळ्या मुलीच झाल्या. त्यामुळे त्या नैराश्यात होत्या. पोलिसांना दिलेल्या जबाबात अनिता यांनी दोन्ही मुलींचा ताप आल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. मात्र ताप आली तरी दोघींचाही एकाचवेळी मृत्यू होणे, हे संशयास्पद आहे. त्यामुळे यात घातपाताचाही संशय असू शकतो. शवविच्छेदन अहवालानंतर खरे कारण समोर येईल, असे सपोनि मारोती मुंडे यांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडhospitalहॉस्पिटलPoliceपोलिसFamilyपरिवार