चेहऱ्यावरील रोमछिद्रे मोठी का होतात आणि कसे दूर करायचे याचे डाग?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 12:43 PM2019-12-14T12:43:18+5:302019-12-14T12:52:10+5:30

अनेकदा चेहऱ्यावरील पोर्स म्हणजेच रोमछिद्रे मोठे होतात? हे का मोठे होतात असा प्रश्न अनेकांना पडतो. त्वचेला गरज असले तेव्हा हे पोर्स आपोआप मोठे होतात आणि बंद होतात.

Why facial pores become big and how to remove them? | चेहऱ्यावरील रोमछिद्रे मोठी का होतात आणि कसे दूर करायचे याचे डाग?

चेहऱ्यावरील रोमछिद्रे मोठी का होतात आणि कसे दूर करायचे याचे डाग?

googlenewsNext

(Image Credit : hudabeauty.com)

अनेकदा चेहऱ्यावरील पोर्स म्हणजेच रोमछिद्रे मोठे होतात? हे का मोठे होतात असा प्रश्न अनेकांना पडतो. त्वचेला गरज असले तेव्हा हे पोर्स आपोआप मोठे होतात आणि बंद होतात. या प्रक्रियेसाठी त्वचेमध्ये विशेष प्रकारचा लवचिकपणाचा गुण असतो. अनेकदा केमिकल युक्त ब्युटी प्रॉडक्ट आणि प्रदूषणामुळे त्वचेचा हा लवचिकपणा हरवतो. अशात चेहऱ्यावरील रोमछिद्रे उघडले तर जातात, पण बंद होत नाहीत. रोमछिद्रे मोठे होऊ लागतात आणि याने तुमच्या सुंदरतेवर परिणाम होऊ लागतो.

हे पोर्स नियमित उघडे राहिल्याने चेहऱ्यावर पिंपल्सही होतात. हे पोर्स लपवण्यासाठी महिला मेकअपचा आधार घेतात, पण हा तात्पुरता उपाय आहे. जर तुम्हाला ही समस्या नेहमीसाठी दूर करायची असेल तर काही घरगुती उपाय तुम्ही करू शकता.

रोमछिद्रांची स्वच्छता

(Image Credit : thriftyfun.com)

जेव्हा रोमछिद्रामध्ये धुळ, माती, तेल, बॅक्टेरिया जमा होतात तेव्हा त्यावर सूज दिसू लागते. त्यामुळे चेहऱ्यावरील पोर्स म्हणजेच रोमछिद्रे मोठी दिसू लागतात. जर रोमछिद्रांमध्ये काही जमा झालं असेल तर ते बंद होणार नाहीत. त्यामुळे रोमछिद्रांची स्वच्छता फार गरजेची आहे.

पपई फेसपॅकने रोमछिद्रांची स्वच्छता

(Image Credit : beautifulhameshablog.com)

पपईच्या पेस्टमध्ये थोडं मध आणि कच्च दूध मिश्रित करून पॅक तयार करा. हा पॅक चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर चेहरा धुवा. आता चेहऱ्यावर तुम्हाला तेज आलेलं दिसेल आणि रोमछिद्रेही लहान झालेली दिसतील.

गुलाबजल फायदेशीर

(Image Credit : stylecraze.com)

रोमछिद्रे बंद आणि स्वच्छ करण्यासाठी गुलाबजलचा फायदा होऊ शकतो. यासाठी त्यात अर्धा चमचा चंदन पावर आणि एक चमचा लिंबाचा रस मिश्रित करून चेहऱ्यावर लावा. ५ मिनिटांनंतर चेहरा नॉर्मल पाण्याने धुवावा. याने रोमछिद्रांची समस्या बरीच कमी झालेली असले.

दह्याचा करा वापर

(Image Credit : Social Media)

दह्यातील लॅक्टिक अ‍ॅसिड रोमछिद्रांमधील जमा धुळ, तेल, बक्टेरिया दूर करतं. तसेच याने रोमछिद्रेही बंद होतात. यासाठ एक चमचा दही चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनंतर भिजलेल्या टॉवेलने चेहरा स्वच्छ करा आणि नंतर पाण्याने धुवा. दही त्वचेवर अ‍ॅंटी-एजिंगसारखं सारखं काम करतं. लॅक्टिक अ‍ॅसिडमध्ये हेल्दी बॅक्टेरिया आढळतात. ज्याने त्वचेचा रंग खुलतो. सुरकुत्या येत नाहीत.

टोमॅटोचा रस

(Image Credit : India.com)

टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावून काही वेळ हलक्या हाताने मसाज करा. हा उपाय आठवड्यातून दोनदा करा. याने उघडलेली रोमछिद्रे बंद होतील. तसेच टोमॅटोमुळे चेहऱ्यावर ग्लो सुद्धा येईल आणि त्वचेला पोषणही मिळेल. 

काय करू नये?

(Image Credit : stylecaster.com)

काही महिला चेहऱ्यावरील मोठे झालेली रोमछिद्रे दिसू नये म्हणून मेकअप करतात. पण फार जास्त वेळ मेकअप करून ठेवाल तर रोमछिद्रे आणखी मोठे होतील. त्यामुळे चेहऱ्याची नियमितपणे स्वच्छता करा. केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय कधीही चांगले.


Web Title: Why facial pores become big and how to remove them?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.