शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

मुलायम आणि चमकदार केस मिळवण्यासाठी मेहंदीमध्ये काय टाकावं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 1:45 PM

केसांना नैसर्गिक रंग देण्यासाठी मेहंदीचा वापर पुन्हा एकदा चलनात आला आहे. कारण मेहंदीच्या वापराने केस सुरक्षित होतात. केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी मेहंदीचा वापर प्राचीन काळापासून केला जातो.

(Image Credit : www.femina.in)

केसांना नैसर्गिक रंग देण्यासाठी मेहंदीचा वापर पुन्हा एकदा चलनात आला आहे. कारण मेहंदीच्या वापराने केस सुरक्षित होतात. केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी मेहंदीचा वापर प्राचीन काळापासून केला जातो. पण अनेकजण मेहंदीमुळे केस रखरखीत झाल्याची तक्रार करतात. पण काही नैसर्गिक पदार्थ केसांची चमक वाढवण्यासाठी आणि मुलायम करण्यासाठी फायदेशीर ठरतात. चला जाणून घेऊ केसांचं सौंदर्य आणखी चांगलं ठेवण्यासाठी मेहंदीमध्ये काय मिश्रित करावं.

१) बीट

बीटाच्या रसात भरपूर प्रमाणात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि पाणी असतं. जे केसांना हायड्रेट ठेवतात आणि केस याने कोरडे किंवा सुष्क होत नाहीत. बीट उकडून मेहंदीमध्ये टाकल्यास केसांना नैसर्गिक रंग मिळतो, ज्याने केसांचं सौंदर्य अधिक वाढतं. 

२) अंड्यातील पांढरा भाग

(Image Credit : naturalpedia.com)

केस मुलायम करण्यासाठी अंड्यातील पांढरा भाग मेहंदीमध्ये मिश्रित करा. अंड्यातील प्रोटीन केसांना चमकदार आणि सुंदर करतात. त्यामुळे याचा वापर फायदेशीर ठरतो.

३) लिंबाचा रस

(Image Credit ; www.popsugar.com)

लिंबात व्हिटॅमिन सी असतं जे केसांना रखरखीत किंवा सुष्क होण्यापासून रोखतं. लिंबाचा रस मेहंदीमध्ये मिश्रित करून केसांना लावला तर केस निरोगी आणि मुलायम होतात. 

४) ऑलिव ऑइल

ऑलिव ऑइलमधील फॅट्स केसांना पोषण देतात आणि केसांचा रखरखीतपणा दूर करतात. केसांचं सुष्क होणं रोखण्यासाठी मेहंदीमध्ये ऑलिव ऑइल मिश्रित करा. याने केसांना चांगला फायदा होईल.

५) मेथी

मेथी पावडर मेहंदीमध्ये टाकून भिजवा. ही मेहंदी केसांना लावा. मेथीच्या पावडरमध्ये भरपूर प्रोटीन असतं. जे डोक्याच्या त्वचेला इन्फेक्शन होण्यापासून रोखतं. तसेच याने केस मजबूत आणि मुलायम होता. 

(टिप : वरील लेखातील उपाय हे माहिती म्हणून देण्यात आले आहेत. ते वापरण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कारण काहींना यातील गोष्टी सूट होतीलच असं नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपाय फॉलो केले तरच फायदा होईल.)

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स