उन्हामध्ये पडणार नाही गोरा रंग काळा; हे उपाय नक्की ट्राय करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 15:30 IST2019-04-30T15:29:24+5:302019-04-30T15:30:08+5:30
उन्हाळ्यामध्ये अनेकदा आपल्या त्वचेचा मूळ रंग नाहीसा होतो. म्हणजेच उन्हामुळे त्वचा काळवंडते. प्रखर ऊन त्वचेचा मूळ रंग नाहीसा करतं. पण घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही.

उन्हामध्ये पडणार नाही गोरा रंग काळा; हे उपाय नक्की ट्राय करा
उन्हाळ्यामध्ये अनेकदा आपल्या त्वचेचा मूळ रंग नाहीसा होतो. म्हणजेच उन्हामुळे त्वचा काळवंडते. प्रखर ऊन त्वचेचा मूळ रंग नाहीसा करतं. पण घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. अशातच तुम्ही जर तुमच्या बीझी शेड्यूलमधून फक्त 15 मिनिटं स्वतःसाठी दिली बाजारातील प्रोडक्ट्सऐवजी फक्त घरगुती पदार्थांचा वापर केला तरी तुमच्या त्वचेचा मूळ रंग परत मिळवणं अगदी सोपं असतं.
सनस्क्रिनचा वापर करा
उन्हाळ्यामध्ये घरातून बाहेर पडताना चेहऱ्यासोबतच शरीराच्या इतर भागांवरही सनस्क्रिन किंवा ब्रॉड स्पेक्ट्रम क्रिम लावायला विसरू नका. रात्री चेहरा स्वच्छ करून व्यवस्थित मॉयश्चराइज करा. यामुळे चेहरा कोरडा होत नाही. उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून 3 ते 4 वेळा स्क्रब नक्की करा आणि जेवढं शक्य असेल तेवढं लिक्विड डाएट घ्या.
कच्च दूध आणि गुलाब पाणी
त्वचेला ताजगी देण्यासाठी कच्च्या दुधामध्ये थोडसं गुलाब पाणी आणि पाणी एकत्र करून चेहऱ्यावर लावा. उन्हाळ्यामध्ये त्वचेची खास देखभाल करणं गरजेचं असतं. त्यामुळे बाहेरून जेव्हाही घरी पोहोचाल तेव्हा सर्वात आधी थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. त्यानंतर चेहरा कोरडा करून कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावा.
टॅनिंग दूर करेल चहाचं पाणी
एक कप पाण्यामध्ये चहा पावडर उकळून पाणी गाळून घ्या. त्यानंतर थंड करून त्वचेवर 15 मिनिटांसाठी लावा. यामुळे टॅनिंग दूर होते. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही टी बॅग पाण्यामध्ये भिजवून डोळ्यांवर ठेवा. डोळ्यांची जळजळ दूर होते.
(Image Credit : Organic Facts)
कोरफडीची पानं करतात मदत
कोरफड त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. त्याचबरोबर सनबर्न दूर करण्यासाठीही मदत करते. कोरफडीच्या ताज्या पानांचा गर काढून 10 ते 15 मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा आणि त्यानंतर चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासाने स्वच्छ पाण्याने धुवून टाका.
लिंबू आणि मलई त्वचेसाठी फायदेशीर
सनबर्नपासून वाचण्यासाठी दिवसातून एकदा दूधाच्या ताज्या मलईमध्ये काही लिंबाचे थेंब आणि गुलाब पाणी एकत्र करून चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनी नॉर्मल पाण्याने धुवून टाका. यामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि त्वचेच्या समस्या दूर होतात.
कच्चा बटाटा उजळवतो रंग
सनबर्नपासून बचाव करण्यासाठी तुम्ही बटाट्याचा वापर करू शकता. त्यासाठी कच्चा बटाटा किसून त्याचा रस काढून घ्या. यामध्ये मध एकत्र करून त्वचेवर लावा. सुकल्यानंतर पाण्याने धुवून टाका. टॅनिंग दूर करण्यासाठी मुलतानी मातीमध्ये काकडीचा रस आणि काही लिंबाच्या रसाचे थेंब एकत्र करा. आठवड्यतून दोन वेळा चेहऱ्यावर लावल्याने फायदा होतो.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.