Valentine Day : 'या' तीन स्टेप्सच्या मदतीने मिळेल पार्लर स्टाइल लूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 12:54 PM2019-02-11T12:54:03+5:302019-02-11T12:56:20+5:30

आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. मग ते घरगुती असो किंवा पार्लर ट्रिटमेंट. सर्वांमध्ये उठून दिसण्यासाठी त्या वाटेल ते करण्यासाठी तयार असतात.

Valentine Day special makeup tips for parlour style look at home | Valentine Day : 'या' तीन स्टेप्सच्या मदतीने मिळेल पार्लर स्टाइल लूक!

Valentine Day : 'या' तीन स्टेप्सच्या मदतीने मिळेल पार्लर स्टाइल लूक!

googlenewsNext

आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. मग ते घरगुती असो किंवा पार्लर ट्रिटमेंट. सर्वांमध्ये उठून दिसण्यासाठी त्या वाटेल ते करण्यासाठी तयार असतात. बाजारामध्ये मिळणाऱ्या महागड्या प्रोडक्ट्सपासून, महागड्या पार्लर ट्रिटमेंट आणि अगदी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यापर्यंत त्या सगळे उपाय ट्राय करतात. फक्त एवढचं नाही तर मेकअप प्रोडक्ट्सचाही आधार घेतात. नो-मेकअप लूकपेक्षा त्या मेकअप लूकला जास्त प्राधान्य देताना दिसतात. अशातच अनेकदा कोणत्या मेकअप प्रोडक्ट्सचा वापर कधी करावा हे त्यांच्या लक्षात येत नाही. कधी कधी माहित नसल्यामुळे या प्रोडक्ट्सचा खूप वापर करण्यात येतो. परिणामी त्याचा त्वचेवर विपरित परिणाम दिसून येतो. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन मेकअप करण्यात येतो. मग एखादं लग्न असो किंवा संगीत, फेस्टिव्हल असो किंवा पार्टी. पण तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही व्यवस्थित माहिती घेतली, तर घरच्या घरी पार्लर स्टाइल मेकअप करू शकता. त्यासाठी तुम्हाला प्रत्येकवेळी पार्लरमध्येही जाण्याची गरज भासणार नाही. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत त्यांचा वापर करून तुम्ही सहज आणि लाइट मेकअपमध्येही सुंदर दिसू शकता. 

(Image Credit : Adore Beauty)

प्रायमर 

प्राइमर म्हणजे मेकअपमधील सर्वात पहिलं आणि मेकअपचा बेस व्यवस्थित ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असलेलं कॉस्मॅटिक प्रोडक्ट. यामुळे मेकअप बिघडत नाही. प्राइमर हाताच्या बोटांच्या सहाय्याने चेहऱ्याच्या फक्त त्या भागात लाव ज्याभागात स्किन पोर्स जास्त आहेत. हे क्रिमप्रमाणे संपूर्ण चेहऱ्यावर लावण्याची गरज नसते. मेकअप करताना सर्वात आधी चेहऱ्यावर प्रायमर लावण्याचा सल्ला देण्यात येतो. पण तुम्ही चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी सर्वात आधी मॉश्चराईज लावा. त्यानंतर प्रायमर लावा. असे केल्याने चेहऱ्यावर ताजेपणा आणि चमक येईल.  प्रायमर लावण्यामुळे तुम्ही केलेला मेकअप चेहऱ्यावर दिर्घकाळ टिकण्यासही मदत होते. 

(Image Credit : Adore Beauty)

कंसीलर 

अनेक महिला कंसीलर आणि फाउंडेशनमध्ये गोंधळून जातात. चेहऱ्यावर आधी काय लावावं? कंसीलर की फाउंडेशन... हा त्यांच्यासमोर असलेला गहन प्रश्न. पण अजिबात गोंधळून जाण्याची गरज नाही. मेकअप करताना फाउंडेशनआधी कंसीलर लावतात. प्रायमर लावल्यानंतर कंसीलर लावल्याने चेहऱ्यावरील डाग किंवा सुरकुत्या नाहीशा होतात. म्हणून कंसीलर खासकरून डोळ्यांखाली आणि चेहऱ्यावरील डार्क स्पॉट असलेल्या भागांवर लावा. 

फाउंडेशन 

फाउंडेशन मेकअप करताना सर्वात महत्त्वाचं प्रोडक्ट आहे. यामुळे आकर्षक लूक मिळण्यास मदत होते. पण फाउंडेशन निवडताना व्यवस्थित तुमच्या स्किन टोननुसार निवडा. अन्यथा लूक बिघडू शकतो. 

मेकअप करताना या तीन प्रोडक्ट्सच्या सहाय्याने मेकअपचा बेस तयार केल्याने तुम्हाला फायदा होईल. यामुळे तुमच्या मेकअपचा बेस व्यवस्थित तयार होऊन तुम्हाला पार्लर लूक मिळण्यास मदत होते. म्हणून मेकअप करताना तुम्ही या स्टेप्स फॉलो केल्या तर घरच्या घरी पार्लर लूक मिळवू शकता. 

Web Title: Valentine Day special makeup tips for parlour style look at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.