तुळशी ही एक औषधी वनस्पती आहे हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. तुळशीच्या पानांच्या सेवनाने खोकला, सर्दी, तणाव आणि इतरही समस्या दूर होतात. त्यासोबतच तुळशीच्या पानांच्या मदतीने वेगवेगळे आजारही दूर केले जातात. तसेच आरोग्यासोबतच तुळशीचे त्वचेसाठीही अनेक फायदे आहेत. तुळशीचा वापर त्वचेसाठी केल्यास बाजारातील कोणत्याही महागड्या क्रिमपेक्षा जास्त फायदा बघायला मिळू शकतो. चला जाणून तुळशीचे त्वचेला होणारे फायदे....
पिंपल्स करा दूर
नियमितपणे तुळशीच्या पानांचं सेवन केल्याने रक्त शुद्ध होतं. त्यामुळे आपोआप तुमची पिंपल्स येण्याची समस्या दूर होते. जर तुमच्या त्वचेवर पुरळ किंवा पिंपल्स असतील तर तुम्ही तुळशीच्या पानांचा फेस पॅक करू शकता. यात तुम्ही गुलाबजल, चंदन आणि लिंबू टाकून हा फेसपॅक चेहऱ्यावर लावू शकता.
डाग होतील दूर
तुळशीमध्ये काही असे तत्त्व असतात जे त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी मदत करतात. यासाठी तुळशीच्या पानांची पेस्ट करा, त्यात मध आणि लिंबाचा रस टाका. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. पेस्ट सुकल्यावर चेहरा पाण्याने धुवा.
निरोगी त्वचा
तुळशीच्या पानांमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंड असतात. त्यामुळे याचा वापर केल्याने त्वचा निरोगी तर होतेच तसेच त्वचा उजळते सुद्धा. यासाठी तुळशीच्या पानांच्या पेस्टमध्ये एक चमचा ग्लीसरीन टाका. हे मिश्रण नियमितपणे चेहऱ्यावर लावा. काही दिवसांनी चेहऱ्यात फरक दिसेल.
इन्फेक्शनपासून बचाव
तुळशी एक औषधी आहे. ज्याने त्वचेला होणाऱ्या इन्फेक्शनपासून बचाव केला जाऊ शकतो. यासाठी तुळशीची काही पाने मोहरीच्या तेलात उकडा. हे तेल गाळून इन्फेक्शन झालेल्या जागेवर लावा. याने इन्फेक्शन दूर होईल.
अॅंटी एजिंग
तुळशीमध्ये अॅंटी एजिंग गुण असतात. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येण्याची समस्याही दूर होते. तुळशीचा वापर नियमितपणे केल्याने त्वचा चमकदार आणि टवटवीत होते.