त्वचेवरील वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठी पालक ठरते गुणकारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 17:05 IST2018-09-11T16:48:07+5:302018-09-11T17:05:32+5:30
शरीरासाठी हिरव्या पालेभाज्या फायदेशीर असतात. त्यातल्या त्यात पालक म्हणजे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर. पालकमध्ये मोठ्या प्रमाणावर आयर्न अस्तित्वात असतं.

त्वचेवरील वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठी पालक ठरते गुणकारी!
शरीरासाठी हिरव्या पालेभाज्या फायदेशीर असतात. त्यातल्या त्यात पालक म्हणजे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर. पालकमध्ये मोठ्या प्रमाणावर आयर्न अस्तित्वात असतं. जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. पालक खाल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. तसेच शरीरातील कमजोरी दूर करण्यासाठीही फायदा होतो. पण तुम्हाला माहीत आहे का? पालक खाणं शरीराप्रमाणेच त्वचेसाठीही लाभदायक ठरतं. त्वचा उजळवण्यासाठी तसेच त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी पालक अत्यंत फायदेशीर ठरते. पालकमध्ये अॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. जे वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. जाणून घेऊयात त्वचेचं सौंदर्य राखण्यासाठी पालक खाण्याचे फायदे...
1. शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्याबरोबरच केसांच्या गळण्यावरही पालक फायदेशीर ठरते. अशातच पालकचा ज्यूस घेणं फायदेशीर ठरतं. पालकमध्ये मोठ्या प्रमाणावर आयर्न असतं. जे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास फायदेशीर ठरतं. दररोज पालकचा ज्यूस प्यायल्याने केसांचं गळणं कमी होतं.
2. त्वचेसाठीही पालक फार फायदेशीर ठरते. पालकच्या ज्यूसमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी असतात. जे त्वचेवरील मृत पेशी काढून नवीन पेशी तयार करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते.
3. जर सतत उन्हामध्ये फिरल्यामुळे तुमची त्वचा काळवंडली असेल तर दररोज पालकचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं. पालकच्या ज्यूसमध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे सुर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचं रक्षण करतात.
4. अनेकदा त्वचेला योग्य पोषण न मिळाल्यानेही कमी वयातच व्यक्ती वयस्कर दिसू लागते. त्वचेवर डाग, सुरकुत्या व निस्तेजपणा येतो. यासर्व समस्या दूर करण्यासाठी पालकचा उपयोग होतो.