सुंदर त्वचेसाठी सर्वात बेस्ट आयुर्वेदिक उपाय चंदनाचं तेल, याचे फायदे वाचाल तर सर्व ब्युटी प्रॉडक्ट्स वापरणं सोडाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 11:44 IST2020-02-15T11:43:54+5:302020-02-15T11:44:24+5:30
चंदनाचा सामान्यपणे आपल्याकडे लाल चंदन आणि पांढरं चंदन असाच होतो. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जगभरात १२ प्रकारचं चंदन आढळतं.

सुंदर त्वचेसाठी सर्वात बेस्ट आयुर्वेदिक उपाय चंदनाचं तेल, याचे फायदे वाचाल तर सर्व ब्युटी प्रॉडक्ट्स वापरणं सोडाल!
चंदनाचा सामान्यपणे आपल्याकडे लाल चंदन आणि पांढरं चंदन असाच होतो. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, जगभरात १२ प्रकारचं चंदन आढळतं. आयुर्वेदात चंदन तेल आणि पावडरच्या वापराचा वापर पूर्वीपासून होतो आहे. याचे आरोग्य आणि सुंदरतेसाठी अनेक फायदे होतात.
चंदनाचा त्वचेला फायदा
चंदनाच्या तेलात आणि लाकडामध्ये १२५ प्रकारचे असे तत्व असतात ज्याने आपली त्वचा सुंदर होण्यास मदत मिळते. याने आपल्या त्वचेवरील डॅमेज सेल्स रिपेअर होतात म्हणजेच त्वचेच्या कोशिका चांगल्या होतात. हेच कारण आहे की, याचा वापर जगभरातील वेगवेगळ्या ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये केला जातो.
चंदनाची खासियत
चंदनाचा गुणधर्म हा थंड आहे. याचा लेप लावल्याने त्वचेची जळजळ शांतच होत नाही तर याच्या सुंदधाने मानसिक शांतताही मिळते. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या चेहऱ्यावर चंदनाचा लेप लावाल तर याने सतत होणारी डोकेदुखीही दूर होऊ शकते.
राग शांत करण्यास मदत
ज्या लोकांना राग जास्त येतो त्यांना चंदनाचा टिळा लावण्याचा सल्ला दिला जातो. कारण आपल्या शरीरात असलेल्या ७ चक्रांपैकी एक आणि सर्वात पॉवरफूल चक्र आपल्या दोन्ही डोळ्यांच्या मधे असतं. म्हणजे ती जागा जिथे आपण टिळा लावतो. इथे चंदन लावल्याने आपलं मन आणि मेंदूला फायदा होतो.
डोळ्यांचा थकवा करा दूर
जर तुमचे डोळे थकलेले दिसत असतील तर याने तुमच्या चेहऱ्याच्या सौंदर्यात कमतरता येते. त्यामुळे डोळ्याच्या आजूबाजूची त्वचा सुंदर करण्यासाठी तुम्ही चंदन पावडरमध्ये मध मिश्रित करून लावू शकता.
डोळ्यांवर कसं करतं काम?
चंदन आणि मधाचा लेप डोळ्यांच्या नाजूक त्वचेला ओलावा आणि थंडावा देतो. मधामुळे स्कीन मॉइश्चराइज होते. त्यामुळे तिथे सुरकुत्या, सूज दिसत नाही. त्यासोबत त्या जागेवरील डॅमेज सेल्सही रिपेअर होतात.
पिंपल्स करा दूर
चंदन पावडरमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. हे त्वचेवर कोणत्या प्रकारचे बॅक्टेरिया अॅक्टिव होऊ देत नाही. पोर्स क्लीन ठेवतात आणि त्वचेवरील अतिरिक्त तेल दूर करतं. याने चेहऱ्यावर पिंपल्स येत नाही आणि चेहरा उजळलेला दिसतो.