शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
2
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
3
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
केंब्रिजमधून M. Phi, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
5
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
6
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
7
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
8
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
9
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
10
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
11
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
12
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
13
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
14
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
16
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण

पावसाळ्यात अशी घ्या तेलकट त्वचेची काळजी; सौंदर्य खुलण्यास होईल मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 11:31 AM

पावसाळ्यात ऑयली स्किन असणाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कारण या वातावरणामधील ओलाव्यामुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

पावसाळ्यात ऑयली स्किन असणाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कारण या वातावरणामधील ओलाव्यामुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जर काही घरगुती उपाय केले तर या समस्यांपासून सुटका करणं सहज शक्य होतं. 

बेसन आणि लिंबू 

दोन चमचे बेसन आणि एका लिंबाचा रस एकत्र करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर होण्यास मदत होते आणि त्यावेळी चेहऱ्याचा चिकटपणा दूर होतो. 

कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा

कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ केल्याने पोर्समध्ये जमा झालेली घाण आणि ऑइल दूर होण्यास मदत होते. यामुळे त्वचेमधील ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होतं. त्यामुळे पिंपल्सपासूनही सुटका होते. 

काकडी 

एक काकडी घेऊन तिची पातळ स्लाइस कापून घ्या. रात्री आणि दुपारी चेहरा धुतल्यानंतर हे चेहऱ्यावर ठेवा. अर्ध्या तासाने पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. काकडी चेहऱ्याचा तेलकटपणा दूर करण्यासोबतच थंडावा देण्यासाठीही मदत करतो. यामुळे त्वचेला येणारी खाज दूर होते. 

मुलतानी माती आणि गुलाब पाणी 

एक चमचा मुलतानी माती आणि दोन चमचे गुलाब पाणी एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्यावर अर्धा तासासाठी लावा आणि त्यानंतर हलक्या गरम पाण्याने चेहरा स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावरील घाण दूर होण्यासोबतच पिंपल्स, अॅक्ने, काळे डाग, ड्रायनेस इत्यादी समस्या दूर होण्यास मदत होते. 

मध आणि साखर 

मध आणि साखर एकत्र करून स्क्रब तयार करा. स्क्रबिंगची ही पद्धत त्वचा खोलवर स्वच्छ करण्यासाठी मदत करते. यामुळे त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्सMonsoon Specialमानसून स्पेशलAyurvedic Home Remediesघरगुती उपाय