तुम्ही जो लीपबाम वापरता त्याबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 04:19 PM2019-12-07T16:19:29+5:302019-12-07T16:46:33+5:30

हिवाळा सुरु झाल्याने त्वचा रूक्ष आणि कोरडी पडत आहे. हिवाळ्यात साधारणपणे पायाला भेगा पडणे.

Know the things about lipblam | तुम्ही जो लीपबाम वापरता त्याबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?

तुम्ही जो लीपबाम वापरता त्याबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?

Next

हिवाळा सुरु झाल्याने त्वचा रूक्ष आणि कोरडी पडत आहे. हिवाळ्यात साधारणपणे पायाला भेगा पडणे, ओठ फाटणे यांसारख्या त्वचेच्या समस्या उद्भवतात. यांपासुन त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला या बाजारात उपलब्ध असलेली महागडी उत्पादनं वापरतात. कारण थंडीच्या दिवसात आोठांची काळजी घेतली नाही. तर ओठा कोरडे पडणे. ओठातुन रक्त येणे. यांसारख्या समस्या उद्भवतात. त्यातीलच एक म्हणजे ओठ फाटू नये. म्हणून वेगवेगळ्या लीप बामचा वापर महिला करतात कारण लीप बाम वापरल्यामुळे आोठ मऊ राहतात. लिप बाममुळे होणारे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहित आहेत. पण काही वेळा लीप बामचा वापर हा महागात सुध्दा पडू शकतो. जाणून घ्या लीपबामच्या वापराबाबत माहीत नसलेल्या गोष्टी. 

लीप बाम  निवडताना प्रामुख्याने  त्यामधील SPF तपासून पहा. सनसक्रीनमधील zinc oxide घटक सूर्याच्या घातक किरणांपासून तुमचा बचाव होतो. तुमच्या लीप बाम मध्ये SPFनसल्यास मॉईश्चराईझिंग लीप बाम लावा. लीप बाममुळे ओठ मुलायम आणि चमकदार राहतात.

लीपबाम ओठांना लावल्यानंतर काही खाताना जर समजा तोंडावाटे पोटात गेलं. तर त्यामुळे आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. पण थोड्या फार प्रमाणात लीपबाम पोटात गेल्यास फारसं नुकसान होत नाही. पण जर जास्त प्रमाणात गेलं तर आरोग्यासाठी महागात पडू शकत.

 एखादी गोष्ट आपल्या सारखी वापरात असेल तर आपल्याला त्या गोष्टीची सवय लागते. पण लीपबाममध्ये असे कोणतेही विषारी घटक नसतात. ज्याच्यामुळे ते वापरल्यानंतर त्याची सवय लागेल. पण जर घरगुती वापराच्या पदार्थांनी ओठ मऊ ठेवायचे असतील. तर तूपाचा वापर करा. हिवाळ्यात ओठांना तूप लावल्यास लाभदायक ठरतं

लीपबामचा वापर केवळ ओठांवरच नाही तर शरीराच्या इतर भागांवर देखील करु शकतो. नाकावर, भुवयांच्या भागात करता येतो. त्यामुळे त्वचा मुलायम राहते. प्रत्येक लीपबामला एक्सपायरीची तारीख असते. ती तारीख पाहुनच वापर करा. तारीख संपलेला लिपबाम जर तुमच्या वापरात असेल, तर नुकसानकारक ठरु शकतं.

Web Title: Know the things about lipblam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य