know the benefits of sex proof makeup | अनेक महिलांच्या चर्चेत असणारा सेक्स-प्रूफ मेकअप, जाणून घ्या कसा आहे...

अनेक महिलांच्या चर्चेत असणारा सेक्स-प्रूफ मेकअप, जाणून घ्या कसा आहे...

सध्याच्या काळात  महिला या स्वतःचे लुक्स आणि मेकअपच्या बाबतीत खूप जागरूक दिसून  येतात. कारण प्रत्येकालाच स्पेशल दिसायचं असतं. महिलांची मेकअप करण्याची आवड आणि सवय लक्षात घेता बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मेकअपच्या उत्पादनांत वाढ होत आहे.  पण तुम्हाला हे माहित आहे का सेक्स प्रुफ मेकअप काय आहे. सध्या महिलांमध्ये सेक्स प्रुफ मेकअप खूप चर्चेत आहे.  चला तर मग जाणून घेऊया  काय आहे हा सेक्सप्रुफ मेकअपविषयी.

Image result for sex proof makeup

मुली  आजकाल एका विशिष्ट प्रकारच्या ब्युटी प्रोडक्टसच्या मागे वेड्या आहेत.  जे प्रोडक्टस सेक्सप्रुफ असल्याचा दावा केला जात आहे.  जर  तुम्हाला सुद्धा हे ब्युटी प्रोडक्टस ट्राय  करायचे असतील तर हे काय हे जाणून घेणं महत्वाचं आहे.  हा मेकअप एकदा केल्यानंतर सुद्धा अनेक तास तसाच राहतो. हा मेकअप खराब होत नाही.  तसंच या मेकअपमुळे तुमच्या बेडशीटवर कोणत्याही प्रकारचा डाग सुद्धा लागणार नाही.( हे पण वाचा-नखांच्या आजूबाजूची त्वचा काळी पडत असेल तर 'या' उपायांनी त्वचेला उजळदार बनवा)

Things To Know About Sex Proof Makeup

या प्रोडक्टची पुर्ण रेंज  म्हणजेच सेक्स प्रुफ मेकअपचे अनेक प्रकार  बाजारात उपलब्ध करून दिली आहे.  Heaux Cosmetics या ब्रॅण्डची ही सेक्स प्रुफ उत्पादनं आहेत. यात तेल, पावडर, क्रिम्स, लिपस्टीक अशा अनेक वस्तु महिलांसाठी लॉन्च करण्यात आल्या आहेत. सेक्स वर्कर्ससाठी असलेल्या या प्रोडक्टसचा  वापर इतर महिला सुद्धा करत आहेत. या कंपनीने असा दावा केला आहे की गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर सुद्धा हा मेकअप  तसाच टिकेल.  वेबसाईट्सच्या माध्यमातून तुम्ही या प्रोडक्टसची खरेदी करू शकता. ( हे पण वाचा-महागड्या क्रिम्स नाही तर तांदूळ आणि हळदीच्या पॅकमुळे मिळवा डागरहीत चेहरा)

Web Title: know the benefits of sex proof makeup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.