शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
6
aumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
7
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
8
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
9
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
10
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
11
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
12
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
13
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
14
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
15
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
16
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
17
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
18
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
19
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
20
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’

पावसाळ्यात कपड्यांच्या दुर्गंधीने आहात हैराण? या उपायांनी सोडवा ही समस्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 11:36 AM

पावसाळ्यात वेगवेगळ्या समस्याही डोकं वर काढू लागतात. वेगवेगळ्या समस्यांमध्ये धुतलेल्या कपड्यांची दुर्गंधी येणे ही समस्या सगळ्यांसाठीच फार डोकेदुखीची ठरते.

(Image Credit : repairaid.co.uk)

पावसाळ्यात वेगवेगळ्या समस्याही डोकं वर काढू लागतात. वेगवेगळ्या समस्यांमध्ये धुतलेल्या कपड्यांची दुर्गंधी येणे ही समस्या सगळ्यांसाठीच फार डोकेदुखीची ठरते. याने होतं असं की, तुम्हालाही दुर्गंधीचा त्रास होतो आणि तुमच्या सोबतच इतरांनाही त्रास होतो. अनेकांना ही समस्या कशी दूर करायची हे माहीत नसतं. त्यामुळे आम्ही काही टीप्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

पावसाळ्यात कपड्यांची दुर्गंधी येण्याचं कारण?

पावसाळा सुरु होताच कपड्यांना एक वेगळाच दमट वास यायला लागतो. अनेकदा घाम आणि पावसाचं पाणी एकत्र झाल्यानेही हा वास येतो. त्यामुळे अनेकांना चारचौघात लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागतो. अशात यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करत असतात. पण तरीही ही दुर्गंधी दूर होत नाही. त्यामुळे काही घरगुती उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

(Image Credit : freepik.com)

कपडे धुतल्यानंतर चांगले पिळायला हवे

पावसाळ्या उन कमी पडतं त्यामुळे सुकायला घातलेल्या कपड्यांचा वास यायला लागतो. अशात कपडे धुतल्यानंतर त्यातील पाणी चांगल्याप्रकारे पिळायला हवं. कपड्यांमधील पाणी पूर्णपणे निघाल्यावर कपडे फॅनच्या हवेत सुकायला ठेवा.

(Image Credit : Better HouseKeeper)

इस्त्री करा

धुतलेल्या कपड्यांमध्ये आताही वास येत असेल तर ते कपडे वापरण्याआधी एकदा इस्त्री करा किंवा रात्रीच त्या कपड्यांना इस्त्री करुन फॅनच्या हवेखाली ठेवा. इस्त्री केल्यामुळे कपड्यांचा वास पूर्णपणे निघून जातो.

(Image Credit : The News Minute)

कपडे उघड्यावर ठेवा

अनेकदा पावसाळ्यात घरात एकप्रकारचं दमट वातावरण निर्माण होतं. त्यामुळे कपड्यांनाही एक वेगळाच वास यायला लागतो. अशावेळी धुतलेले कपडे कपाटात ठेवण्यापेक्षा मोकळ्या हवेत ठेवा.

(Image Credit : Oriental-Style)

परफ्युम-डिओड्रन्ट

पावसाळ्यात घामाच्या दुर्गंधी दूर करण्यासाठी डिओचा वापर करा. बाहेर जाताना बॅगमध्ये डिओ सोबत ठेवा. कपड्यांचा अधिकच वास येत असेल तर डिओचा वापर करु शकता.

एक्स्ट्रा कपडे ठेवा

पावसाळ्यात ऑफिसला जाताना कपड्यांची एक जोडी सोबत ठेवा. कारण पावसात भिजल्यानंतर कितीही डिओचा वापर केला तरी कपड्यांना वास येतोच. त्यामुळे सोबत कपडे सोबत ठेवल्यास ते तुम्ही बदलू शकता.  

या गोष्टींचीही घ्या काळजी

1) पावसाळ्यात उन कमी पडत असल्याने कपडे कमी धुवायला काढले तर चांगलं. 

2) कपडे सुकवण्यासाठी न्यूज पेपरचा वापर करा. हॅंगरला लटकवलेल्या कपड्यांखाली न्यूज पेपर ठेवा. पेपर पाणी शोषूण घेतो. 

3) कपडे धुतल्यानंतर काही वेळ पाणी झरण्यासाठी तसेच ठेवा. त्यानंतर ते मोकळ्या जागेत सुकायला ठेवा.

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलBeauty Tipsब्यूटी टिप्स